ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : मंत्रीपद हुकले, तिकिटाचीही गॅरंटी नाही...राष्ट्रवादीच्या सत्तेतील प्रवेशाने शिंदे गटात अस्वस्थता!

author img

By

Published : Jul 5, 2023, 10:36 PM IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्तेतील प्रवेशामुळे शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे. पक्षाच्या अनेक नेत्यांही आपली नाराजी मीडियासमोर उघडपणे व्यक्त केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत आमदारांनी आपली खदखद शिंदेसमोर मांडल्याची चर्चा आहे.

Maharashtra Political Crisis
महाराष्ट्राचे राजकीय संकट

मुंबई : अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी भाजप नेत्यांशी जवळीक वाढवून ज्या पद्धतीने राजकीय खेळी केली, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या आधी त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार होता. मात्र अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. आता तर ते ज्या नेत्यांना विरोध करत होते, त्यांनाच सत्तेत भागीदार केले आहे.

अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली : अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेले बहुतांश आमदार हे राज्यातील बडे नेते आहेत. या नेत्यांचा महत्वाच्या मंत्रिपदांवर डोळा आहे. हेच शिंदे गटाला मान्य नाही. मंत्रिपदांचे समान वाटप व्हावे, अशी शिंदे गटाची इच्छा आहे. असे नाही की शिंदे गटाच्या नाराजीचे फक्त तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी यावरून आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

  • #WATCH | Shiv Sena (Eknath Shinde) leader Sanjay Shirsat, says "In politics when our rival gang wants to join us, we have to take them in and that is what BJP did. After NCP joined us, people in our group were upset because some of our leaders will not get their desired position.… pic.twitter.com/IBLDV8i2Eg

    — ANI (@ANI) July 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'सत्तेत सामावून घेण्याची काही घाई नव्हती' : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे. शिरसाट म्हणाले की, 'भाजप आणि शिवसेनेकडे पुरेसे बहुमत होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेत सामावून घेण्याची काही घाई नव्हती'. उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या फारच जवळ गेल्याने आम्ही त्यांच्याविरुद्ध भूमिका घेतल्याचे शिरसाट म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून शरद पवार सर्व निर्णय स्वत: घेत असत. आमच्याकडे दुर्लक्ष झाले म्हणून आम्ही बंड केले, असे ते म्हणाले.

'हा निर्णय भाजपचा' : शिवसेनेचे आणखी एक आमदार भरत गोगावले यांनी तर राष्ट्रवादीच्या सहभागाने अर्धी भाकरी खावी लागेल, असे म्हटले आहे. तसेच हा निर्णय भाजपचा असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट संकेत दिले आहे. गोगावले यांच्या म्हणण्यानुसार या निर्णयामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला मंत्रिमंडळात समाविष्ट केले आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील इच्छुकांच्या शक्यता धूसर झाल्या आहेत. आमचे काही आमदार नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याची जाणीव आहे. - गजानन कीर्तिकर, खासदार, शिवसेना

23 कॅबिनेट पदे रिक्त : सोमवारी शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. बैठकीत मंत्रीमंडळात राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे नेते ज्या मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत होते, त्यात आता वाटेकरी आल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. सध्या 23 कॅबिनेट पदे रिक्त असून राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील उर्वरित पदांमधूनच बाकीचे वाटप करावे लागणार आहे.

'कोणताही आमदार नाराज नाही' : शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी यावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. उदय सामंत म्हणाले की, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वासात घेऊनच सर्व निर्णय झाले आहेत. त्यामुळे कोणताही आमदार नाराज नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच पुढील निवडणुका लढवल्या जातील'.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षात पुतण्या पडतोय काकांवर भारी! जाणून घ्या कोणाकडे आहेत किती आमदार?
  2. NCP Crisis : अजित पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष; एकमताने ठराव मंजूर, पत्र निवडणूक आयोगाला पाठवले
  3. Maharashtra Political Crisis : शिवसेनेची विचारधारा स्वीकारू शकतो, तर भाजपची का नाही? प्रफुल्ल पटेलांचा सवाल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.