ETV Bharat / state

Mumbai News: पालकमंत्र्यांना पालिकेत केबिन कशाला? अर्थमंत्री करणार हस्तक्षेप...

author img

By

Published : Jul 24, 2023, 7:13 PM IST

मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आले आहे. प्रथमच पालकमंत्र्यांचे कार्यालय महापालिका मुख्यालयात सुरु केल्यामुळे यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Mumbai News
मुंबई महानगर पालिकेतील कार्यालये

मुंबई : मुंबई महानगर पालिकेतील सर्वच पक्षांची कार्यालये व समिती कार्यालये अनेक महिन्यापासून बंद आहेत. महानगर पालिकेच्या मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे कार्यालय बनवण्यात आले असल्याने, त्याला ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी विधान सभेत आक्षेप घेतला होता. याचे पडसाद आज विधानपरिषदेत सुद्धा दिसून आले. ही नवीन प्रथा सुरू झाली असून सरकार यावर काही निर्णय घेणार आहे की नाही? असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते, आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला.



नवीन प्रथा सुरू केली : मुंबई महापालिकेच्या मुख्य इमारतीत एक बाजार समितीची केबिन आणि एक शिक्षण समितीच्या अध्यक्षांची केबिन ही दोन केबिन पालकमंत्र्यांना दिली असल्याने, याला ठाकरे गटाच्या आमदारांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना मुंबई महानगरपालिकेत कार्यालय देऊन एक नवीन प्रथा सुरू केली आहे. वर्षभरापासून प्रशासक कारभार चालवत आहेत. ते प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करत आहेत. उपनगरातल्या पालकमंत्र्यांना महापालिकेत कार्यालय द्यायचा काय संबंध. या कार्यालयाद्वारे पालकमंत्री महानगर पालिकेत हस्तक्षेप करत आहेत. जे आमदार मुंबई महानगर पालिकेतून विधापरिषदेवर निवडून गेले आहेत त्यांना तिथे कार्यालय देणे अपेक्षित आहे. अशी मागणी सुद्धा परब यांनी केली आहे.



निधी वाटपात सुद्धा हस्तक्षेप : पालकमंत्री निधी वाटपात सुद्धा हस्तक्षेप करत असल्याचा आरोप परब यांनी लगावला आहे. राज्याचा निधी वाटप हा आमदार, खासदार, पालकमंत्र्यांच्या शिफारशीने होतो. तर महापालिकेचा निधी वाटप वॉर्ड रचनेनुसार होतो. परंतु इथे ३८ हजार वॉर्ड संख्या असलेल्या भागाला १६ हजार कोटी तर ७० हजार वॉर्ड संख्या असलेल्या भागाला साडे चार कोटी इतकाच निधी दिला जातो. हा भेदभाव पालकमंत्री करतात असा थेट आरोप परब यांनी लगावला आहे.



दोन्ही पालक मंत्र्यांशी बोलणार : विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, फेब्रुवारी २०२२ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. पण त्या अजून लांबल्या आहेत. निधी वाटपाबाबत मी वस्तुस्थिती समजून घेतली हे खरे आहे. पालकमंत्र्यांनी काम करत असताना सर्व वॉर्डाचा विचार करायला पाहिजे. मी दोन्ही पालक मंत्र्यांशी बोलून योग्य तो मार्ग काढेन असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar on Base Camp: रायगड जिल्ह्यात एनडीआरएफचा बेस कॅम्प करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार
  2. Maharashtra Politics : भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे झळकले बॅनर; शिंदे-पवार गटात तु तू मै मै
  3. Sunil Tatkare : अजित पवार मुख्यमंत्री होणार? सुनील तटकरेंनी थेटच सांगितले...Watch Video
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.