ETV Bharat / state

Salman Khan Dengue : सलमान खानला डेंग्यू झाल्याची पालिकेकडे नोंदच नाही, माहिती दिल्यास उपाययोजना करणार

author img

By

Published : Oct 22, 2022, 10:35 PM IST

Updated : Oct 22, 2022, 11:00 PM IST

अभिनेता सलमान खानला डेंग्यूची लागण ( Actor Salman Khan infected with dengue ) झाली असून गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे ( Salman Khan infected with dengue ) समजते.

Salman Infected Dengue
Salman Infected Dengue

मुंबई - अभिनेता सलमान खानला डेंग्यूची लागण ( Actor Salman Khan infected with dengue ) झाली असून गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे ( Salman Khan infected with dengue ) समजते. मात्र याबाबत पालिकेकडे आतापर्यंत कोणतीही नोंद झालेली नाही. याची माहिती पालिकेला दिल्यास डेंग्यूच्या आळ्या कुठे निर्माण झाल्या याचा शोध घेवून त्या नष्ट केल्या जातील अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

तर आळ्यांचा शोध घेवू - सलमान खानला डेंग्यूची लागण ( Salman Khan infected with dengue ) ही पनवेल फार्म हाऊस किंवा बिग बॉसच्या सेटच्या ठिकाणी शूटींग दरम्यान झाली असण्याची शक्यता आहे. डेंगीचा डास हा दिवसा दंश करणारा असतो. त्यामुळेच सेटच्या ठिकाणी अडगळीतील वस्तुंमधून डासांची उत्पत्ती झाली असल्याची शक्यता आहे. बिग बॉसचे शूटींग हे लोणावळ्यात सुरू आहे. त्यामुळे मुंबई बाहेरच ही लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान याबाबत पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाशी संपर्क साधला असता सलमान खान यांना डेंग्यू ( Salman Khan infected dengue ) झाल्याची नोंद पालिकेकडे नाही. बहुतेक त्यांनी खासगी हॉस्पिटलमध्ये चाचणी केली असावी. त्यांना डेंग्यू झाल्याचे पालिकेला कळवल्यास आळ्यांचा शोध घेतला जाईल. तसेच खबरदारीचे उपाय केले जातील असे सांगण्यात आले आहे.

लवकरच शूटिंगसाठी परतणार - सलमान खान आगामी चित्रपट 'किसी भाई किसी की जान' या चित्रपटासाठी गेल्या दोन आठवड्यापासून शूटींग करत होते. विश्रांतीचा सल्ला दिल्याने आता इतर कलाकारांसोबत चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. डेंगीची लागण झाल्याने सलमान येत्या विकेंडला बिगबॉसचे होस्टिंगही करणार नाही, अशी माहिती आहे. त्यामुळे करण जोहर या विकेंडला शो साठी होस्ट करणार असल्याचे बोलले जात आहे. सलमानला डेंग्यूची लागण झाल्याने विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळेच करण जोहर बिग बॉस १६ चा विशेष एपिसोड होस्ट करताना दिसेल. सलमान खानच्या नजीकच्या व्यक्तींनी केलेल्या दाव्यानुसार सलमान लवकरच चित्रपटांच्या शूटींगसाठी परतणार असल्याची माहिती आहे. तो सध्या डेंगीवर उपचार घेत असून लवकरच कामाच्या ठिकाणी सक्रीय होईल असेही सांगण्यात येत आहे.

Last Updated : Oct 22, 2022, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.