ETV Bharat / state

Arman Kolhi Bail Application : अभिनेता अरमान कोहलीचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला

author img

By

Published : Feb 22, 2022, 10:26 PM IST

बिग बॉस फेम अभिनेता अरमान कोहली ( Big Boss Fame Arman Kohli ) हा ड्रग्स प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. ( Arman Kohli in Judicial Custody ) अंमली पदार्थ बाळगणे आणि सेवन केल्याप्रकरणी एनसीबीने ( Arman Kohli Arrested by NCB ) अटक केलेल्या अभिनेता अरमान कोहलीला मुंबईतील विशेष NDPS न्यायालयाने मंगळवारी अंतरिम जामीन फेटाळला. ( Special NDPS Court Rejects Arman Kohli Interim Bail )

Actor Arman Kohli
अभिनेता अरमान कोहली

मुंबई - बिग बॉस फेम अभिनेता अरमान कोहली ( Big Boss Fame Arman Kohli ) हा ड्रग्स प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे. ( Arman Kohli in Judicial Custody ) अंमली पदार्थ बाळगणे आणि सेवन केल्याप्रकरणी एनसीबीने ( Arman Kohli Arrested by NCB ) अटक केलेल्या अभिनेता अरमान कोहलीला मुंबईतील विशेष NDPS न्यायालयाने मंगळवारी अंतरिम जामीन फेटाळला. ( Special NDPS Court Rejects Arman Kohli Interim Bail )

अरमान कोहलीने अलीकडेच त्याच्या आजारी पालकांना भेटण्यासाठी 14 दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता. त्यानंतर दोन दिवसांचा जामीन मंजूर करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाकडे केली होती. कोहलीचा नियमित जामीन याचिका विशेष न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीही फेटाळल्या आहेत.

अशी झाली कारवाई -

मागील काही दिवसांपासून NCB ने ड्रग्स तस्करीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत कालपासून मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली जात आहे. या कारवाईमध्ये NCB च्या अधिकाऱ्यांनी 15 पेक्षा अधिक ड्रग्स पेडलर्सना अटक करण्यात आली आहे. NCB चे अधिकारी या ड्रग्स तस्करांची चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान ड्रग्स तस्करीमध्ये अभिनेता अरमान कोहलीचा समावेश असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर याच माहितीच्या आधारे एनसीबीने आज अरमान कोहलीच्या घरावर छापेमारी केली.

अरमानकडे सापडले अमेरिकन कोकेन -

NCBने अरमानच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्याच्याकडे ‘अमेरिकन कोकेन’ सापडले आहे. महत्त्वाचे म्हणजे हे ‘अमेरिकन कोकेन’ विशेष आणि महागड असते त्यामुळे हे अरमानकडे आले कसे याबद्दल आता तपास सुरू करण्यात आला आहे. आता ड्रग्स तस्करांची कोणती गॅंग यात सहभागी आहे, हे ड्रग्स कसे आणले जाते याचा तपास केला जाणार आहे. दम्यान, 2018 मध्ये अरमानला उत्पादन शुल्क विभागाने स्कॉच व्हिस्कीच्या 41 बाटल्या बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. कायदा दारूच्या 12 बाटल्या घरात ठेवण्याची परवानगी देतो, परंतु अरमानकडे 41 पेक्षा जास्त बाटल्या होत्या आणि त्यापैकी बहुतेक विदेशी ब्रँडच्या होत्या. मैत्रिणीला मारहाण केल्याबद्दलही चर्चेत राहिलेला अरमानला अटकही झाली होती.

हेही वाचा - Patra Chawl redevelopment : मुंबई सोडून जाऊ नका! पत्रा चाळवासियांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

कोण आहे अरमान कोहली?

अरमान कोहली हा ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार कोहली आणि ज्येष्ठ अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे. अरमान कोहलीची बॉलिवूड कारकीर्द हिट ठरली नाही. ‘बदले की आग’ आणि ‘राज तिलक’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून अरमानने सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. हे दोन्ही सिनेमे त्याच्या वडिलांनी म्हणजे राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केले होते. विरोधी, दुश्मन जमाना, औलाद के दुश्मन, वीर, कहर, जानी दुश्मन यांसारख्या सिनेमात अरमानने काम केले आहे. त्यानंतर मध्ये 12 वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमातही तो दिसला होता. 2013 सालच्या बिग बॉसच्या सीझनमध्येही अरमान सहभागी झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.