ETV Bharat / state

Accused Of Robbery Arrested: एक्झॉस्ट फॅनमधून दुकानात मध्यरात्री प्रवेश करून लंपास केले 10 लाख, झारखंडमधून आरोपीला अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 10:52 PM IST

Accused Of Robbery Arrested: 10 लाखांच्या चोरीच्या आरोपाखाली पायधुनी पोलिसांनी झारखंडमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. या आरोपीने 14 सप्टेंबरच्या रात्री एक्झॉस्ट फॅनमधून दुकानात प्रवेश करून मस्जिद बंदर परिसरातील मोठ्या शाल आणि ब्लँकेट व्यापाऱ्याचे 10 लाख रुपये चोरले आणि पळून झारखंडला गेला. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून आज त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीस १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पायधुनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कुडापकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

Accused Of Robbery Arrested
झारखंडमधून आरोपीला अटक

मुंबई Accused Of Robbery Arrested: चोरी प्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी राधानगर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपी सैदुल नूर इस्लाम शेख (28) याला अटक करून आज स्थानिक न्यायालयात ट्रान्झिट रिमांडवर नेले. न्यायालयाने शेख याला १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पायधुनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कुडापकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

झारखंडला जाऊन आरोपीस अटक: पायधुनी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली. तसेच या आरोपीविरोधात मुंबई १६ गुन्हे दाखल असल्याने त्याचा फोटो पोलीस ठाण्यात दाखवल्यानंतर आरोपीचा झारखंड येथील मूळ पत्ता पायधुनी पोलिसांना मिळाला. त्यानंतर पायधुनी पोलिसांच्या पथकाने झारखंडला जाऊन ४ दिवसात आरोपी सैदुल नुरीस्लाम शेख याला अटक केली आहे. सैदुल शेख याच्यावर विविध पोलीस ठाण्यात १६ गुन्हे दाखल आहेते. त्याच्या विरुद्ध मुंबईतील काळाचौकी, एमआरए, आरएके आणि आग्रीपाडा पोलीस ठाण्यात घरफोडी आणि दुकान फोडून चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

आरोपी आधीपासून गुन्हेगारी वृत्तीचा: आरोपी विरुद्ध पूर्वीचे रेकॉर्ड होते. त्यामुळे त्याची संपूर्ण माहिती पोलिसांकडे उपलब्ध होती. पायधुनी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र कुडापकर यांनी सांगितले की, झारखंडमधील आरोपीचे मोबाइल लोकेशन सापडल्यानंतर पीएसआय संकल्प मोकल यांना तातडीने पाठवण्यात आले. मुंबई पोलिसांनी राधानगर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपी सैदुल नूर इस्लाम शेख (28) याला अटक करून स्थानिक न्यायालयात ट्रान्झिट रिमांडवर नेले. मुंबईत आल्यानंतर त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपीने 10 लाख रुपये खर्च केल्याची माहिती: आरोपीच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना रोख रक्कम सापडली नाही. 50 हजार रुपये किमतीचा एकच मोबाईल सापडला आहे. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या आरोपीकडून १६ गुन्ह्यांत चोरलेली रक्कम जप्त करण्यात आलेली नाही. पायधुनी पोलिसांनी झारखंड येथील आरोपीच्या घराची झडती घेतली. मात्र, रक्कम आढळून आली नाही. आरोपीने चौकशीत १० लाख खर्च केले असल्याची पोलिसांना माहिती दिली आहे.

हेही वाचा:

  1. Woman Kidnapping Case: तीन लाखांसाठी मैत्रिणीचे अपहरण; अपहरकर्त्या मैत्रिणीसह ७ जणांच्या टोळीचा शोध सुरू
  2. Pune Crime : सोशल मीडियावरील ओळख पडली महागात; कॉलेज तरुणाचं अपहरण करुन केलं अनैसर्गिक कृत्य
  3. Lonavala Gang Rape : पर्यटनाला आलेल्या मुलींचं अपहरण करून सामूहिक बलात्कार; दोन आरोपींसह दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.