ETV Bharat / state

लातूरमध्ये भीषण पाणीटंचाई, 180 टँकरने होणार पाणीपुरवठा

author img

By

Published : Sep 21, 2019, 9:17 AM IST

लातूर जिल्ह्यात भर पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मांजरा धरणातील पाणी पुरवून वापरण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला अनेक निर्णय घ्यावे लागत आहे. सध्या शहराला 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असला तरी या धरणातील 4. 5 दलघमी पाण्याचा योग्य वापर व्हावा शिवाय पाणी गळतीला आळा बसावा, यादृष्टीने नळाने नाही तर टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

लातूरमध्ये भीषण पाणीटंचाई, 180 टँकरने होणार पाणीपुरवठा

लातूर - जिल्ह्यात भर पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मांजरा धरणातील पाणी पुरवून वापरण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला अनेक निर्णय घ्यावे लागत आहे. सध्या शहराला 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असला तरी या धरणातील 4. 5 दलघमी पाण्याचा योग्य वापर व्हावा शिवाय पाणी गळतीला आळा बसावा, यादृष्टीने नळाने नाही तर टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबर पासून 180 टँकर शहरात धावणार आहेत. तर प्रत्येक कुटुंबास 200 लिटर पाणी दिले जाणार आहे.

लातूरमध्ये भीषण पाणीटंचाई, 180 टँकरने होणार पाणीपुरवठा

हेही वाचा - शेअर बाजारासह निफ्टीने गेल्या दहा वर्षाचा 'हा' मोडला विक्रम

शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, धरण क्षेत्रात पाऊसच झाला नसल्याने सध्या पाणीसाठा हा मृतावस्थेत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहराचा पाणीपुरवठा 10 दिवसांवर करण्यात आला होता. त्यानंतर 15 दिवसावर आणि आता भविष्यातील टंचाई लक्षात घेता नळाचे पाणी बंद करून टँकरने फक्त 200 लिटर पाणी दिले जाणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक पर्याय राबिवले. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने ही नामुष्की ओढवली आहे. या पद्धतीने पाणीपुरवठा केल्यास डिसेंबर अखेरपर्यंत पाणी पुरेल, असे पाणीपुरवठा अधिकारी सतीश शिवणे यांनी सांगितले आहे.
यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ 52 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपातील पिके तर हातची गेलीच आहेत. ग्रामीण भागातही हीच अवस्था असल्याने दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे.

Intro:नळाचे पाणी बंद लातूरकरांना आता 180 टँकरने पाणीपुरवठा
लातूर : भर पावसाळ्यात लातुरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मांजरा धरणातील पाणी पुरवून वापरण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाला एक ना अनेक निर्णय घ्यावे लागत आहे. सध्या शहराला 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असला तरी या धरणातील 4. 5 दलघमी पाण्याचा योग्य वापर व्हावा शिवाय पाणी गळतीला आळा बसावा यादृष्टीने आता नळाने नाही तर टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबर पासून 180 टँकर शहरात धावणार आहेत तर प्रत्येक कुटुंबास 200 लिटर पाणी दिले जाणार आहे.


Body:लातूर शहराला मांजरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, धरण क्षेत्रात पाऊसच झाला नसल्याने सध्या पाणीसाठा हा मृतवस्थेत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरवातीलाच शहराचा पाणीपुरवठा 10 दिवसावर करण्यात आला होता. त्यानंतर 15 दिवसावर आणि आता भविष्यातील टंचाई लक्षात घेता नळाचे पाणी बंद करून टँकरने ते ही 200 लिटर पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबर पासून लातूरकरांना घरासमोर 200 लिटरची टाकी ठेवावी लागणार आणि मोजून - मापून पाणी घ्यावे लागणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक ना अनेक पर्याय राबिवले मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने ही नामुष्की ओढवली आहे. या पद्धतीने पाणीपुरवठा केल्यास डिसेंबर अखेरपर्यंत पाणी पुरेल असा विश्वास पाणीपुरवठा अधिकारी सतीश शिवणे यांनी सांगितले आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ 52 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपातील पिके तर हातची गेलीच आहेत परंतु प्रश्न आहे तो पिण्याच्या2 पाण्याचा. ग्रामीण भागातही हीच अवस्था असल्याने दुष्काळ आणखीन काय-काय पाहायला लावील असा सवाल उपस्थित होत आहे.


Conclusion:या आठवड्यात लातुरात नळाला पाणी येण्याची ही शेवटची वेळ आहे. त्यामुळे सण- सुदमध्ये लातूरकरांचे हाल होणार हे नक्की..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.