ETV Bharat / state

Bhalchandra Nemade On Indian politicians: खोक्यावरून आरोप-प्रत्यारोप, पण आपणच...भालचंद्र नेमाडे यांची राजकीय नेत्यांवर टीका

author img

By

Published : Dec 14, 2022, 9:45 AM IST

Bhalchandra Nemade On Indian politicians: "चांगल्या लोकांनी राजकारणात पडूच नये हे असं झालंय. Bhalchandra Nemade On Indian politicians कुठला चांगलं माणूस धजेल यात? खोक्यांची भाषा चालते का? आपल्या सारख्याला शक्य नाही", असं भालचंद्र नेमाडे म्हणाले.

Bhalchandra Nemade On Indian politicians
Bhalchandra Nemade On Indian politicians

जळगाव: आपण हरामखोर लोकांना निवडून देतो, त्याचे हे फळं आहे. आपल्याला कळत नाही का? कोण चांगलं आहे ते आपल्याला उद्याची काळजी असते, काय खावं काही नाही, अर्ध्या लोकांना अन्न मिळत नाही, हे सांगतात पण 60 टक्के लोकं अपुरे राहतात. त्यांना समतोल अन्न मिळत नाही, नीट सगळ्या गोष्टी मिळणं हे होत नाही. Bhalchandra Nemade On Indian politicians आपल्याकडे फार तर 10 ते 15 टक्के लोकांचं नीट चाललंय, अशा लोकांनी कुणाला निवडून द्यावं, हे तर कळलं पाहिजे, काय उपयोग आहे. लोकशाहीचा आपण कुणाला मत देतोय, हे कळल्याशिवाय कशी सुधारणा आहे.

भालचंद्र नेमाडे राजकीय नेत्यांवर संतापले

आपणच हरामखोर लोकांना निवडून देतो: सध्या राजकारणात खोक्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र आपणच हरामखोर लोकांना निवडून देतो. त्याचे हे फळ आहे, असे वादग्रस्त विधान जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केले आहे. दरम्यान सद्यस्थितीत राजकारणात चांगल्या लोकांनी पडू नये, अशी परिस्थिती झाली. सर्वसामान्य माणसांना खोक्याची भाषा चालते का ? असा सवालही भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित केला आहे. 10 ते 15 टक्के लोकांचे व्यवस्थित चालले असून अनेकांना मात्र उद्या काय खावं, याची काळजी असते. त्यामुळे अशा लोकांनी आता कोणाला निवडून द्यावं तरच या लोकशाहीचा उपयोग होईल, असे देखील भालचंद्र नेमाडे यांनी जळगावमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

समाजाला उत्क्रांत अवस्थेत देण्याची क्षमता कलांमध्ये: ज्या समाजात कला आणि साहित्य सोबत वाढत असते. त्या समाजाची उत्क्रांती होत असते. आपली संस्कृती कलेमुळे समृध्द झाली. जेवढे इतर शिक्षण महत्त्वाचे आहे, तितकीचे महत्त्वाची कला आहे. आर्टिस्ट होणं किंवा होऊ देणं हे महत्त्वाचे असून कला, साहित्य, चित्रकला शिल्पकला अशा विविध कलांच्या माध्यमातून आपण समृद्ध होऊया, समाजाला उत्क्रांत अवस्थेत नेण्याची क्षमता केवळ कलांमध्ये असते, असे प्रतिपादन ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले आहे.

भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते सन्मानपूर्ण प्रदान: जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक 'कांताई जैन साहित्य कला जीवनगौरव पुरस्कार' जगप्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांना तर श्रेष्ठ लेखिका म्हणून ‘कवयित्री बहिणाई पुरस्कारा’साठी श्रीमती संध्या नरे-पवार (कुलपवाडी-बोरिवली, मुंबई), श्रेष्ठ कवी म्हणून ‘बालकवी ठोमरे पुरस्कारा’साठी वर्जेश सोलंकी (आगाशी-वसई, मुंबई) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ‘ना. धों. महानोर पुरस्कारा’साठी प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना कस्तुरबा सभागृह, गांधीतीर्थ येथे साहित्य-कला पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानपीठ सन्मानित डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्याहस्ते सन्मानपूर्ण प्रदान करण्यात आला आहे.

बहिणाई पुस्तक प्रकाशन: कांताई साहित्य-कला जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप दोन लक्ष रूपये, आकर्षक सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे तर कवयित्री बहिणाई, बालकवी ठोमरे, ना. धों. महानोर या तिघंही पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रूपये, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ असे आहे. याप्रसंगी डॉ. भालचंद्र नेमाडे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री कविवर्य ना. धों. महानोर, संघपती दलिचंद जैन, भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, सौ.निशा जैन, डाॕ. भावना जैन व सन्मानार्थी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते बहिणाई पुस्तक प्रकाशन करण्यात आले आहे. याप्रसंगी पुस्तकाचे संपादक अशोक चौधरी, संपादन सहाय्यक ज्ञानेश्वर शेंडे, अथर्व प्रकाशनचे युवराज माळी उपस्थीत होते. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बि. जी. शेखर पाटील यांचीही उपस्थीती होती. यावेळी चौघेही पुरस्कार्थींची कार्य परिचयात्मक डॉक्युमेन्ट्री दाखविण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.