ETV Bharat / state

शेतात वाघ आढळला मृतावस्थेत; चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यातील घटना

author img

By

Published : Aug 25, 2019, 8:15 AM IST

Updated : Aug 25, 2019, 8:50 AM IST

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील जूना पोडसा येथील एका शेतात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा मृत्यू

चंद्रपूर - जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील जूना पोडसा गावात एका शेतात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मध्य चांदा वनविभागाचा चमु घटनास्थळी दाखल झाला आहे.

शेतात वाघ मृताअवस्थेत आढळला, चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालूक्यातील घट

मध्यचांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या जूना पोडसा येथील चनकापुरे नामक शेतकऱ्याचा शेतात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. यामुळे काही दिवसापुर्वीच वाघाचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. या वाघाच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

वाघांची संख्या झपाट्याने घटत असल्याने एका-एका वाघांचे संरक्षण करणे गरजेचे बनले आहे. पण, त्याच वेळी अशा दुर्दैवीपणे वाघांचा जीव जात असल्याने वन्यप्राणी संरक्षकांमध्ये चिंता व्यक्त होते आहे.

Intro:चंद्रपुर : जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यातील जूना पोडसा येथिल शेतात पट्टेदार वाघ मृताअवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहीती मिळताच मध्य चांदा वनविभागाची चमु घटनास्थळी दाखल झाली.

मध्यचांदा वनविभाग वनपरिक्षेत्र धाबा अंतर्गत येणाऱ्या जूना पोडसा येथिल चनकापुरे नामक शेतकऱ्याचा शेतात पट्टेदार वाघ मृताअवस्थेत आढळून आला. वाघ कुजलेल्या अवस्थेत आहे.काही दिवसापुर्वी वाघाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान घटनेची माहीती मिळताच वनकर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही.Body:.Conclusion:
Last Updated : Aug 25, 2019, 8:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.