ETV Bharat / state

बुलडाणा: वकाना येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

author img

By

Published : Dec 1, 2019, 10:01 PM IST

सिद्धार्थ कोणालाच न सांगता सकाळी घरून निघून गेला होता. गावात त्याच्या नातलगांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दुपारी वकाना शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सिद्धार्थ आढळला. त्याने दोरीच्या साहाय्याने झाडाला गळफास घेतला होता.

buldana
आत्महत्या केलेल्या युवकाचे दृश्य

बुलडाणा- संग्रामपूर तालुक्यातील वकाना येथे एका ३४ वर्षीय युवकाने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी उघडकीस आली. सिद्धार्थ वसंता गव्हांदे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

सिद्धार्थ कोणालाच न सांगता सकाळी घरून निघून गेला होता. गावात त्याच्या नातलगांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दुपारी वकाना शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सिद्धार्थ आढळला. त्याने दोरीच्या साहाय्याने झाडाला गळफास घेतला होता. त्यानंतर सदर घटनेची माहिती सिद्धार्थच्या नातेवाईकांनी तामगाव पोलिसांना दिली. तामगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंचनामा केला व आकास्मित मृत्यूची नोंद केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोस्टेचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात मंगलसिंग ठाकूर करत आहे.

हेही वाचा- धक्कादायक...! वेळेवर उपचार न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू

Intro:Body:Mh_bul_Youth suicide_10047

Story. वकाना येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

बुलडाणा : संग्रामपुर तालुक्यातील वकाना येथे एका ३४ वर्षीय युवकाने वकाना शिवारात निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
आत्महत्या करणार्‍या युवकाचे नाव सिद्धार्थ वसंता गव्हांदे असून सिद्धार्थ हा सकाळी घरातुन कोणालाच न सांगता घरून निघुन गेला. गावात त्याचा नातलगांनी शोध घेतला असता मिळून आला नाही. मात्र दुपारी वकाना शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचे प्रेत आढळुन आले. सदर घटनेची माहिती नातेवाईकानी तामगाव पोलीसांना देताच तामगाव पोलीसांनी घटनास्थळी पोहचल्यानंतर पंचनामा केला व मुत्‍यूची आकास्मित म्हणुन नोंद केली. या प्रकरणाचा पोस्टे चे ठाणेदार भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात मंगलसिंग ठाकुर करित आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.