ETV Bharat / state

Buldhana Crime: धक्कादायक! बाप लग्न करून देत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून

author img

By

Published : Apr 4, 2023, 9:32 AM IST

son killed the father
मुलाने केला बापाचा खून

बलात्कार, आत्महत्या तसेच अनैतिक संबंधातून हत्या यांसारखे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील धक्कादायक घटना घडली आहे. बाप लग्न करून देत नाही म्हणून मुलाने पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

म्हणून मुलाने केला बापाचा खून

बुलढाणा : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. क्रूर मुलाने पित्याचा खून केल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील अडोळ फाट्यावर घटना घडली आहे. बाप लेक एका वीट भट्टीवर काम करत होते. यामध्ये मुलगा चाळीस वर्षाचा झाला तरी बाप लग्न करून देत नसल्याने मुलगा भानसिंग भैरड्या हा नाराज होता. त्याने वडील नानसिंग भैरड्या यांच्या डोक्यात काठी मारून त्यांचा खून केला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. जळगाव जामोद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ जाऊन मुलास ताब्यात घेऊन अटक केली आहे.

डोक्यातच बांबूच्या काठीने मारहाण: बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव काळे येथून जवळच असलेल्या, घाट पळशी ते पळशी फाटा पिंपळगाव काळे शिवारा मधील हरिभाऊ दयाराम तायडे यांच्या वीट भट्टीवर पिता-पुत्रांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. मुलगा भाऊ सिंग भैरड्या (40) याने वडील भानसिंग वर्ष (६०) यांचा डोक्यातच बांबूच्या काठीने मारहाण केली. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.


मुलाविरोधात गुन्हा दाखल: आजूबाजूच्या परिसरात अधिक चौकशी केली असता, ही घटना रात्रीची असल्याची चर्चा होती. घटनेची माहिती कामावरील माणसाने मयूर हरिभाऊ तायडे यांना फोनद्वारे दिली. आरोपीचे वडील हे लोखंडी पलंगावर पडलेले होते. त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. याविषयी मयूर हरिभाऊ तायडे यांनी पोलीस स्टेशन जळगाव येथे फिर्याद दाखल केली. तर पुढील तपास सहपोलीस निरीक्षक कैलास चौधरी करीत आहे. ही घटना एक एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता उघडकिस आली. याप्रकरणी आरोपी मुलगा भैरड्या यांच्या विरुद्ध कलम 302 आयपीसी नुसार गुन्हा दाखल झाला. ठाणेदार झांबरे यांनी गतिमान तपासचक्र फिरवून दोन तासात आरोपीस अटक केली आहे.

हेही वाचा: Buldhana Crime धक्कादायक गर्लफ्रेंडनं दिला धोका अन् बुलढाण्यातील काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्या शहराध्यक्षाने केली आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.