ETV Bharat / state

'त्या' शेतकऱ्याची आत्महत्या गृहकलहातून, पोलीस तपासात निष्पन्न

author img

By

Published : Oct 14, 2019, 5:17 PM IST

रविवारी बुलडाणा जिल्ह्यात भाजपच्याच एका कार्यकर्त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली होती. या आत्महत्येमागे 'घरगुती कलह' हे कारण असल्याचे, प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

बुलडाण्यात शेतकऱ्याची आत्महत्या

बुलडाणा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भाजपचे उमेदवार डॉ संजय कुटे यांच्या प्रचारार्थ बुलढाणा येथे सभा होत आहे. मात्र काल रविवारी बुलडाणा जिल्ह्यात भाजपच्याच एका कार्यकर्त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली होती. या आत्महत्येमागे 'घरगुती कलह' हे कारण असल्याचे, प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याची आत्महत्या 'घरगुती कलहातून झाल्याचे पोलिस प्राथमिक तपासात निष्पन्न

रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील खातखेड या गावातील राजेश ज्ञानदेव तलवारे (३५) याने 'पुन्हा आणूया आपले सरकार' असा संदेश देणारा टी-शर्ट अंगात घालत आत्महत्या केली. त्याच्या गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह गावालगतच्या एका शेतात दिसून आला. राजेशच्या नावावर कुठलीही शेती नाही, मात्र गायरान (शासनाची) जमिन तयार करून राजेश त्यावर शेती करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवत होता. त्याला पत्नी आणि चार अपत्य आहेत. शेतकऱ्यांना शेतात कामासाठी लागणारे मजूर पुरविण्याचे काम तो करायचा, मात्र काही लोकांकडे त्याचे पैसे थकल्याने आणि मजुरांना पैसे देणे बाकी असल्याने त्याच्यावर २ लाखांहून अधिकचे कर्ज झाले होते.

हेही वाचा... 'पुन्हा आणूया आपले सरकार'.. भाजपचा टी शर्ट घालून बुलडाण्यात शेतकऱ्याची आत्महत्या

दरम्यान विधानसभा निवडणुकीत कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या प्रचारार्थ त्याने मागील आठवडा भरापासून परिसर पिंजून काढला होता, असे त्याचे मित्रमंडळी सांगत आहेत. मात्र राजेश तलवारे या युवकाने घरगुती अंतर्गत कलहातून आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

हेही वाचा... 'आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, मलाही जशास-तसे उत्तर देता येते'

रविवारी दुपारी राजेश तलवार याचा मृतदेह शेगाव येथील शासकीय रुग्णालयात आणून त्यावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी रुग्णालयात पोहचून राजेशच्या नातेवाईकांची भेट घेतली. या घटनेने खातखेड गावावर शोककळा पसरली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी राजेश हा शेतकरी असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा दावा केला आहे.

Intro:Body:खुलासा

बुलडाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुलढाणा जिल्ह्यात दाखल होत असतानाच रविवारी भापच्याच एका कार्यकर्त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली घटना उघड झाली होती. मात्र संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या कार्यकर्त्याची आत्महत्या चे मात्र घरगुती अंतर्गत कलह असल्याचे समोर आले आहे.
रविवारी ते बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील खातखेड या गावातील भारतीय जनता पक्षाच्या राजेश ज्ञानदेव तलवारे वय ३५ या कार्यकर्त्यांचा पुन्हा अनुया आपले सरकार असा संदेश देणारा टी-शर्ट अंगात घातलेल्या अवस्थेत गावालगतच्या एका शेतात गळफास असलेल्या व लटकलेल्या स्थितीत दिसून आले. राजेश हा अत्यल्पभूधारक शेतकरी असला तरी त्याच्या नावावर कुठलीही शेती नाही. मात्र गायरान (शासनाची) जामिनाला तयार करून राजेश त्यावर शेती करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालवीत होता.त्याला पत्नी आणि चार अपत्य हि आहे. शेतकऱ्यांना शेतात कामासाठी लागणारे मजूर पुरविण्याचे काम तो करायचा मात्र काही लोकांकडे त्याचे पैसे थकल्याने आणि मजुरांना पसे देणे असल्याने २ लाखांच्या जवळपास तो कर्जबाजारी हि झाला होता. दरम्यान विधानसभा निवडणुकीत कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या प्रचार्थ त्याने मागील आठवडा भरापासून परिसर पिंजून काढत होता असे त्याचे मित्रमंडळी सांगीत आहेत. मात्र राजेश तलवार या युवकाने घरगुती अंतर्गत कलहातून आणि कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केल्याचा पोलिसांना तपासात समोर आले आहे. तर प्रशासनाने या प्रकरणात खुलासा करीत मृतक युवक राजेश तलवारे या युवकाकडे शेती नसून तो शेतकरी नसल्याचे प्रसिद्धी माध्यमांना कळविले आहे.
दरम्यान दुपारी राजेश तलवार याचे प्रेत शेगाव येथील शासकीय रुग्णालयात आणून त्यावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांनी रुग्णालयात पोहचून राजेशच्या नातेवाईकांची भेट घेतली. उत्तरीय तपासणी नंतर राजेश्वर सोमवारी खातखेड गावातील स्मशानभूमीत अंतिम संस्कार पार पाडण्यात आले. या घटनेने खातखेड गावावर शोककळा पसरली आहे. दुसरीकडे या प्रकरणात मात्र राजकारण हि होत असल्याचे दिसून येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी मृतक युवक हा शेतकरी असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा दावा केला आहे.


बाईट - प्रशांत डिक्कर (जिल्हाध्यक्ष-स्वाभिमानी शेतकरी संघटना)
बाईट - गोकुळ सूर्यवंशी (ठाणेदार - शेगाव ग्रामीण )

Farmar suicide_1



Attach Vidio File - 00
Attach Foto File - 01
Attach Audio File - 00
-----------------------------------------------

- फहिम देशमुख, शेगाव (बुलडाणा)
मोबा- 09922014466Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.