ETV Bharat / state

नगरपालिकाच करणार बाप्पाचे विसर्जन; प्रभाग निहाय मूर्तींचे केले जाणार संकलन

author img

By

Published : Aug 29, 2020, 8:04 PM IST

कोरोनाच्या संकटामुळे जिल्हा प्रशासनाने काही अटी घालून गणेश मंडळांना गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी परवानगी दिली होती. आता गगणेश विसर्जन मिरवणुक काढता येणार नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश काढले आहेत. नगरपालिका प्रशासन स्वतः गणेश मूर्तींचे संकलन करून विसर्जन करणार असल्याबाबत बीड जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

immerse Bappa
बाप्पाचे विसर्जन

बीड - यंदा 1 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे विसर्जन होत आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे गणेश विसर्जनाच्या मिरवणुक काढण्याबाबत बीड जिल्हाधिकारी यांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे नगरपालिका प्रशासनच गणेश मूर्तींचे विसर्जन करणार आहे.

नगर पालिका प्रशासनाने प्रभाग निहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांकडून तसेच गणेश मंडळांकडून मूर्तींचे संकलन करून एकत्रित गणेश विसर्जन नगरपालिका प्रशासनाकडूनच केले जाणार आहे. याबाबतची सर्व तयारी नगरपालिकेने केली असल्याचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटामुळे जिल्हा प्रशासनाने काही अटी घालून गणेश मंडळांना गणेश मूर्ती स्थापन करण्यासाठी परवानगी दिली होती. आता गणेश विसर्जनासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. गणेश विसर्जन मिरवणुक काढता येणार नाही. याबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश काढले आहेत. नगरपालिका प्रशासन स्वतः गणेश मूर्तींचे संकलन करून विसर्जन करणार असल्याबाबत बीड जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

कोरोना विषाणूचे होत असलेले संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहे. सार्वजनिक ठिकाणी सोशल गॅदरिंग होऊ नये यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी पुढाकार घेतला असून नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर व नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.