ETV Bharat / state

State Level Essay Competition : राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत वैजापुरच्या सुपुत्राचे यश; उद्योगमंत्री सुभाष देसाईंच्या हस्ते गौरव

author img

By

Published : Mar 3, 2022, 8:03 PM IST

राज्यस्तरीय आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत महिला ( State Level Essay Competition ) आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गायकवाड ( Sanjay Gaikwad Win Essay Competition ) यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल संजय गायकवाड यांना मुंबईत गौरवण्यात आले आहे.

State Level Essay Competition
State Level Essay Competition

वैजापूर ( औरंगाबाद ) - राज्यस्तरीय आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ( State Level Essay Competition ) महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक संजय गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला ( Sanjay Gaikwad Win Essay Competition ) आहे. त्याबद्दल संजय गायकवाड यांना उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते मुंबई येथे गौरवण्यात आले.

मराठी राजभाषा दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या विशेष पुढाकाराने ‘माझ्या मते मैत्री म्हणजे’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. याबद्दल गायकवाड यांना मुंबई येथील चर्चगेट परिसरातील वालचंद हिराचंद हॉल येथे गौरवण्यात आले.

यावेळी उद्योग व खनिकर्म ( मराठी भाषा ) मंत्री सुभाष देसाई, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, महिला विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, व्यवस्थापकीय संचालक श्रध्दा जोशी, महाव्यवस्थापक कुसुम बाळसराफ आदी उपस्थित होते. त्यांच्या या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

हेही वाचा - गोव्यात सत्ता स्थापनेच्या पाठिंब्यासाठी भाजप विरोधी पक्षांवर ईडी, सीबीआयचा दबाव आणतंय - मायकल लोबो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.