ETV Bharat / state

Prakash Ambedkar On Congress NCP Alliance : काँग्रेस, राष्ट्रवादीला गरज असेल तर, माझ्याशी बोलावे; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

author img

By

Published : Jan 22, 2023, 10:13 PM IST

काँग्रेस राष्ट्रवादीला जर गरज असेल त्यांनी आमच्याशी बोलणी करावी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी बोलली करायला गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला नकार दिला होता. त्यामुळे आता त्यांना गरज वाटत असेलच तरच त्यांनी आमच्याशी बोलणी करावी असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते आज अमरावतीत बोलत होते.

Etv Bharat
Etv Bharat

काँग्रेस,राष्ट्रवादीला गरज असेल तर, माझ्याशी बोलावे

अमरावती - जुनी पेन्शन योजना संघटनेने लिंगाडे यांना समर्थन दिले आहे. त्याविषयी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हा सगळा मूर्खांचा बाजार आहे. ज्या पक्षाने जुनी पेन्शन योजना रद्द केली त्याच पक्षाच्या उमेदवाराला मी पाठिंबा देत आहे. याला काय म्हणावे असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला. पदवीधर मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ओंकार अमलकर यांच्या प्रचारनिमित्त अमरावतीत आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.

आमच्या उमेदवाराला निवडून द्यावे - धन, घराणेशाही नको असेल तर आमच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. ज्याप्रकारे शहरी भागात पदवीधर मतदार संघ आहे त्याच प्रकारे ग्रामीण भागात सुद्धा पदवीधर मतदारसंघ आहे. ग्रामीण भागात आमची यंत्रणा स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांच्यापर्यंत सहजासहजी शक्य होते. यापूर्वी पदवीधर मतदारसंघासाठी आम्ही निवडणूक लढवली नाही. परंतु जे कोणी शिक्षक मतदार संघात उभे राहत होते त्यांना आम्ही पाठिंबा दर्शवत होतो. परंतु एकत्रितपणे राजकारणामध्ये जो काही घोळ चाललेला आहे तोच घोळ पदवीधर मतदारसंघातही दिसत आहे.

नवीन शैक्षणिक धोरण लादले जातेय - राजकारणामध्ये नीतिमत्ता केव्हा येईल, हे सांगता येत नाही. परंतु या गोंधळाला कुठेतरी अंत दिला पाहिजे. त्या दृष्टीने कोकण विभाग सोडून चारही मतदारसंघांमध्ये आम्ही निवडणूक लढवत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. केंद्र सरकारचे नवीन शैक्षणिक धोरण हे राज्य सरकारवर सरळ सरळ लादत आहे. राज्य सरकारची कुठलीही तयारी नसताना केंद्र सरकार हे धोरण राज्य सरकारवर लादत आहे, असा आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला. नवीन शैक्षणिक धोरण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि स्किल डेव्हलपमेंट या महत्त्वाच्या गोष्टी आहे असे मी समजतो असे ते म्हणाले.

पेन्शन देण्याबाबत सरकार उदासीन - ज्या कर्मचाऱ्यांनी तीस ते चाळीस वर्षे सेवा केली अशा कर्मचाऱ्यांना सरकार पेंन्शन पासून वंचित ठेवत आहे. पेन्शन देणे हे सरकारचा सरकारच्या तिजोरी भार पडते असे सरकारचे म्हणणे आहे. परंतु ते मात्र, सपशेल खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. जे कर्मचारी सरकारची एवढे वर्ष सेवा करतात त्यांनाच पेन्शनपासून सरकार वंचित ठेवत आहे. शासनाने जुनी पेन्शन स्कीम सुरू करून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली पाहिजे. आम्ही सत्तेमध्ये असल्यास जुनी पेन्शन योजना नक्कीच लागू करू.

पेन्शन स्कीमचे प्रश्न - विद्याप्रेमी यूजीसीच्या गाईडलाईन्स न पडता शिक्षकांच्या नियुक्त केल्या आहेत. त्यामुळे आज त्या प्राध्यापकांच्या विविध समस्या उद्भवले आहेत. विद्यापीठाने त्यांच्या तसेच मुलाखती घेतल्या त्यांना रुजू करून घेतले. पण, आज मात्र त्यांच्या पेन्शन स्कीमचे प्रश्न उभे आहेत. याप्रकरणी सरकारनं ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा -Teacher Graduate Election Process : शिक्षक, पदवीधर मतदारसंघात 'असे' निवडले जातात आमदार; महाविकास आघाडी Vs भाजप थेट लढत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.