ETV Bharat / state

खासदार नवनीत राणांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद; नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार

author img

By

Published : Nov 9, 2019, 4:12 PM IST

अवकाळी पावसामुळे सोयाबीनसह कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पर्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सांत्वना व दिलासा देण्यासाठी जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या. येथे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

खासदार नवनीत राणा

अमरावती- जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कपाशीला जबर फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीनसह कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी खासदार नवनीत राणा आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या. येथे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

प्रतिक्रिया देताना खासदार नवनीत राणा

जिल्हात मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, उडीद, मूगसह भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेतल्या जाते. मात्र, अवकाळी पावसामुळे सोयाबीन पावसात भिजले. त्यामुळे सोयाबीन काळपट पडले तर, अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन कुजले. त्यामुळे जिल्ह्यात शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांनी शेतात जाऊन शेती पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी राणा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत तातडीने नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा- ...अखेर 'मुख्यमंत्रि'पदाचा तिढा सुटला; 'या' नेत्याचा नावावर झाला शिक्कामोर्तब, व्हिडीओ व्हायरल

Intro:खासदार नवनीत राणा पोहचल्या शेतकऱ्याच्या बांध्यावर
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

अमरावती अँकर
:-अमरावती जिल्हात अवकाळी पावसामुळे सोयाबीन कपाशीला जबर फटका बसला त्यामुळे सोयाबीन सह कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना सांत्वना व दिलासा देण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या व त्यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

जिल्हात मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी,उडीद,मूग सह भाजीपाला पिकांना फटका बसला जिल्हात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे उत्पादन घेतल्या जाते मात्र अवकाळी पावसामुळे सोयाबीन पावसात भिजले त्यामुळे सोयाबीन काळपट पडले तर अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन कुजले होते त्यामुळे जिल्हात शासनाने वतीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण सुरू आहे त्यामुळे खासदार नवनीत राणा यांनी शेतात जाऊन शेती पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्यांच्याशी संवाद साधत तातडीने नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे नवनीत राणा यांनी सांगितले

बाईट-नवनीत राणा,खासदार अमरावतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.