ETV Bharat / state

Bachchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

author img

By

Published : Feb 11, 2022, 2:42 PM IST

Updated : Feb 11, 2022, 4:32 PM IST

राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विधानसभा निवडणुकीत मुंबईत असलेला फ्लॅटची माहिती लपविल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

बच्चू कडू
बच्चू कडू

अमरावती : 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट लपवणे बच्चू कडू यांना महागात पडले. त्यांनी उमेदवारी अर्जात मुंबई येथील फ्लॅट ची माहिती लपवली होती. याबाबत भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्ये तक्रार केली होती. आज चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाचा या प्रकरणात निर्णय आला असून, बच्चू कडू यांना 25 हजार दंड आणि 2 महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सूनावली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

बच्चू कडू म्हणाले..

विधानसभा निवडणूक लढवताना 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते. त्या घराचा उल्लेख उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता. मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाने आमदारांची एक सोसायटी गठीत करून घरासाठी कर्ज दिले होते. हेच ते घर असून 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जावर या घरासाठी घेतलेल्या कर्जाची रक्कम आम्ही नोंदवली होती. मात्र घर क्रमांक देण्यास विसरलो होतो. हा संपूर्ण प्रकार अचलपूरला घडला आणि या प्रकरणाची तक्रार चांदूर बाजार येथील व्यक्तीने आसेगाव येथील पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला आणि एका प्रकरणात तो दिला होता. त्याचाच वचपा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खरं तर न्यायालयाने या प्रकरणात चुकीचा निर्णय दिला असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

वरच्या न्यायालयात जाऊ

न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्याचे आम्ही स्वागत करत असलो तरी, आता आम्हाला जामीन मिळाला आहे. याप्रकरणी वरच्या न्यायालयात आम्ही जाणार आहोत. वरच्या न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

Last Updated : Feb 11, 2022, 4:32 PM IST

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.