ETV Bharat / state

साई मंदिर परिसरातील 'हा' आकाश कंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र

author img

By

Published : Oct 26, 2019, 5:43 PM IST

Updated : Oct 27, 2019, 12:52 PM IST

दिवाळी निमित्त शिर्डीतील साईबाबा मंदिरही विविध आकाश कंदीलांनी सजले आहे. यात साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आलेला २१ फुट उंच आणि १४ फुट रुंद अशा इकोफ्रेंडली आकाश कंदिलाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

कंदील

अहमदनगर- दिवाळी निम्मित्त सर्वत्र आकाशकंदील लावले जात आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिरही विविध आकाश कंदिलांनी सजले आहे. यात साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आलेला २१ फुट उंच आणि १४ फुट रुंद अशा इकोफ्रेंडली आकाश कंदिलाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

साईबाबा समाधी मंदिर परिसरात भक्तांनी भेट दिलेले विविध आकाश कंदील लावण्यात आले. यात कोपरगावच्या मुकबधीर शाळेतील मुलांनी बनविलेला भव्य आकाश कंदील देखील लावण्यात आला आहे. त्याला पहाण्यासाठी अनेक भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली आहे. तसेच हा सुंदर कंदील बनविल्याबद्दल भाविकांकडून मुलांचे कौतुक केले जात आहे. हा भव्य आकाश कंदील बनविण्यासाठी मुलांना विद्यालयाचे चित्रकला शिक्षक रवींद्र कांबळे यांच्यासह इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.

साई मंदीर परिसरातील 'हा' आकाश कंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र

त्याचबरोबर, आकाश कंदील बनविण्यासाठी शिर्डीतील शिलधी प्रतिष्ठाणाने आर्थिक मदत केली आहे. धनत्रयदशी आणि वसूबारसच्या मुर्हूतावर शाळेतील विद्यार्थी सुभाष चौधरी, तेजस बिडवे, भागवत शिंदे, तेजस्विनी सुरभैय्या, कोमल व्यास राहील शेख, प्रतिक्षा संगवे यांनी बनविलेला हा इकोफ्रेंडली आकाश कंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा- कर्जत-जामखेडमध्ये नवे 'रोहित'पर्व, भाजपच्या राम शिंदेंचा दारुण पराभव

Intro:



Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ दिवाळी निम्मीत्त सर्वत्र आकाशकंदील लावले जातायेत शिर्डीतील साईबाबा मंदीरही विवीध आकाश कंदीलांनी सजलय यात सर्वांचे लक्ष वेधुन घेतोय तो २१ फुट उंच आणि १४ फुट रुंद असा मूकबधिर विद्यार्थ्यांच्या हातून पहिल्यांदाच बनवलेला इकोफ्रेंडली आकाश कंदिल साई मंदिर परिसरात लावण्यात आला आहे....साईबाबा समाधी मंदिर परिसरात भक्तांनी भेट दिलेले विविध आकाश कंदील लावण्यात आलेत कोपरगावच्या मुकबधीर शाळेतील मुलांनी बनविला भव्य असा आकाश कंदिल पहाण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी करत हा कंदील बनिविणार्या मुलांचे कौतुक केलय. हा आकाश कंदिल बनवण्यासाठी विद्यालयाचे चिञकला शिक्षक रविंद्र कांबळेसर यांच्या सह विद्यालयाचे सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभलय शिर्डीतील शिलधी प्रतिष्ठाणने हा भव्य आकाश कंदील बनविण्यासाठी आर्थिक मदत देवु केली आहे आज धनञयोदशी आणि वसुबारसच्या मुहुर्तावर आमच्या शाळेतील विद्यार्थी सुभाष चौधरी, तेजस बिडवे,भागवत शिंदे,तेजस्विनी सुरभैय्या,कोमल व्यास राहील शेख,प्रतिक्षा संगवे यांनी भव्य असा इकोफ्रेंडली आकाषकंदिल सर्वांच लक्ष वेधुन घेतोय. दिपावली निन्मीताने साई मंदीरासह रंगीबेरंगी विद्यित दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे.....

BITE_ तेजस बिडवे विद्यार्थी

BITE_ भास्कर गुरसळ मुख्याध्यापकBody:mh_ahm_ shirdi diwali big lantern_26_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_ shirdi diwali big lantern_26_visuals_bite_mh10010
Last Updated : Oct 27, 2019, 12:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.