ETV Bharat / state

Sai Baba Donation : वर्षभरात साईबाबांच्या चरणी 'इतक्या' कोटींचे दान; आकडा पाहून व्हाल थक्क..

author img

By

Published : Nov 17, 2022, 9:19 PM IST

शिर्डी येथील साईबाबांच्या दानपेटीत कोव्हिड कालावधीनंतर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून (Sai Baba Donation) या काळात भाविकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. (Sai Baba Donation in a year).

Sai Baba Donation
Sai Baba Donation

शिर्डी - देशातील अतिश्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या साईबाबा संस्थानच्या दानपेटीत (Sai Baba Donation) वर्षभरात सुमारे ३९८ कोटीपेक्षा जास्त रुपयांचे विक्रमी दान जमा झाले आहे. (Sai Baba Donation in a year). या दरम्यान अडीच ते तीन कोटी भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत

कोरोनानंतर वाढ - करोडो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दानपेटीत कोव्हिड कालावधीनंतर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असून भाविकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. साईबाबांच्या दानपेटीत मागील ऑक्टोबर २०२१ पासून ते नोव्हेंबर २०२२ या वर्षभरात ३९८ कोटी रुपयांपेक्षा जास्त भरभरून दान जमा झाले असून सुमारे अडीच ते तीन कोटी भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली आहे.

एकूण 398 कोटींची देणगी - या मध्ये देणगी काऊंटरवर ७७ कोटी ८९ लाख ४ हजार ९८४ तर दक्षिणापेटीत १६८ कोटी ८८ लाख ५ हजार २६० रुपये जमा झाले आहेत. ऑनलाईन पध्दतीने ७३ कोटी ५४ लाख ३४ हजार ८० रुपये, चेक डिडीद्वारे १९ कोटी ६८ लाख ४१ हजार ४०८ रुपये, डेबिट क्रेडिट कार्ड द्वारे ४२ कोटी ४२ हजार १२० रुपये, मनिऑर्डरने २ कोटी २९ लाख ७६ हजार ५६४ रुपये, तर १२ कोटी ५५ लाख ३० हजार ३३४ रुपये किमतीचे २७ किलो ३०५.४५० ग्रॅम सोने आणि १ कोटी ६७ लाख ९६ हजार ७६१ रुपये किमतीचे ३ हजार ५६ किलो ३०५.४७० ग्रॅम चांदी साईबाबांच्या झोळीत जमा झाले आहे. असे एकूण ३९८ कोटी ५३ लाख ३१ हजार ५११ रुपयांचे घसघशीत दान जमा झाले असल्याचे भाग्यश्री बानायत यांनी सांगितले.

तिरुपती नंतर दुसरा क्रमांक - देशातील नंबर एकचे तिर्थक्षेत्र तिरुपती बालाजी देवस्थानच्या तुलनेत साईबाबांच्या चरणी चाळीस टक्के दान जमा झाले आहे. तिरुपती बालाजी देवस्थानचे वार्षिक दान जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या घरात असते. त्या तुलनेत देशात तिरुपतीनंतर शिर्डीच्या साईबाबांचा नंबर लागतो. हळूहळू या दानाचा आकडा वाढतच चालला आहे. यंदाच्या वर्षातील एवढे मोठे दान हा साईबाबा संस्थानच्या इतिहासात विक्रमच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.