ETV Bharat / sports

Neeraj Chopra : कमालच! नीरज चोप्राची एकदाच भालाफेक, पात्रता स्पर्धेत अंतिम स्थान

author img

By

Published : Jul 22, 2022, 9:07 AM IST

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Javelin Thrower Neeraj Chopra ) सातत्याने नवनवे विक्रम करत आहे. स्वीडनमध्ये सुरू असलेल्या डायमंड लीगच्या स्टॉकहोम हंगामात त्याने 89.94 मीटरच्या विक्रमी भाला फेकत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविलेला आहे.

नीरज चोप्रा
नीरज चोप्रा

यूजीन - ऑलिम्पिक पदक विजेता ( World Athletics Championships ) नीरज चोप्राने कमाल करून दाखविली आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतरासह भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. पात्रतेसाठी, खेळाडूला किमान 83.50 मीटर अंतरावर भालाफेक करण्याचे उद्दिष्ट होते.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा ( Javelin Thrower Neeraj Chopra ) सातत्याने नवनवे विक्रम करत आहे. डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी करताना त्याने रौप्यपदकावर कब्जा केला ( Neeraj Chopra won the silver medal ) होता. स्वीडनमध्ये सुरू असलेल्या डायमंड लीगच्या स्टॉकहोम हंगामात त्याने 89.94 मीटरच्या विक्रमी भाला फेकत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविलेला आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा ( Gold Medalist Neeraj Chopra ) याने 2022 साठीची आपली महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्ये जाहीर केली आहेत, ज्यात त्याच्या पहिल्या जागतिक विजेतेपदासाठी आव्हान असलेले राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकांचे रक्षण करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. टोकियो गेम्स भालाफेकीत सुवर्णपदक विजेत्या चोप्राने प्रतिष्ठित 2022 लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्ससाठी ( Laureus World Sports Awards 2022) वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर श्रेणीमध्ये नामांकन मिळविले.

मला आयुष्यात आणखी चांगले करण्याची प्रेरणा- चोप्राने लॉरियसच्या अधिकृत वेबसाइटला सांगितले की, सुवर्णपदकाने मला आयुष्यात आणखी चांगले करण्याची प्रेरणा दिली आहे. जुलैमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत चांगली कामगिरी करून पोडियम गाठण्याचे माझे ध्येय असेल. याशिवाय या वर्षी राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि डायमंड लीग फायनल्स यासारख्या इतर मोठ्या स्पर्धा आहेत. या सर्व खरोखर प्रमुख स्पर्धा आहेत.

यंदा पोडियमवरच स्पर्धा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न-24 वर्षीय अॅथलीट म्हणाला, "प्रशिक्षण घेत असताना मला या सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये पदके जिंकायची आहेत, असे नेहमी मनात येते. मी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा ( Commonwealth and Asian Games ) स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली आहेत आणि तिथेही माझ्या कामगिरीची पुनरावृत्ती करू इच्छितो. लंडन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत मी भारताचे प्रतिनिधित्व केले. मी तिथे अंतिम फेरीत पोहोचू शकलो नाही, पण यंदा पोडियमवरच स्पर्धा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.