ETV Bharat / sports

Ravi Shastri on Virat Kohli : रवी शास्त्रींनी विराटबाबत केले मोठे विधान; ऑस्ट्रेलियासाठी कोहली ठरणार घातक फलंदाज

author img

By

Published : Feb 7, 2023, 9:37 PM IST

आगामी बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेच्या पहिल्या दोन डावांत भारतीय फलंदाज विराट कोहलीने चांगली सुरुवात केली तर तो ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी 'काटा' ठरणार आहे, असा विश्वास भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.

Border Gavaskar Trophy
रवी शास्त्रींनी विराटबाबत केले मोठे विधान; ऑस्ट्रेलियासाठी कोहली ठरणार घातक फलंदाज

नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची सुरुवात ९ फेब्रुवारीपासून नागपूर कसोटीने होत आहे. कसोटीतील विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे. याआधी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत दमदार कामगिरी केली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले, तर कोहलीने 36 डाव खेळले असून, त्यात त्याने 1682 धावा केल्या आहेत. कोहलीने या डावात ५ अर्धशतके आणि ७ शतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याने सर्वाधिक 169 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना आशा आहे की, कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली दमदार कामगिरी कायम ठेवणार आहे.

कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम प्रेरणादायक : एका खासगी क्रीडा वाहिनीने आयोजित केलेल्या आभासी पत्रकार परिषदेत बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम प्रेरणा देणारा आहे. तुम्ही त्याचे पहिले दोन डाव बघावेत. जर त्याने चांगली सुरुवात केली, तर तो ऑस्ट्रेलियन संघासाठी काटा ठरणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाविरुद्धच्या फलंदाजाच्या विक्रमाबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीची सरासरी ५० पेक्षा कमी आहे, जी पुढे नेली पाहिजे. तथापि, 2017 मध्ये जेव्हा कांगारूंनी शेवटचा भारत दौरा केला, तेव्हा कोहलीला त्यांच्याविरुद्ध संघर्ष करावा लागला. कोहलीने खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये कोहलीने 9.20 च्या सरासरीने केवळ 46 धावा केल्या.

दुखापतग्रस्त यष्टीरक्षक ऋषभ पंतची पोकळी भरून काढणे आवश्यक : त्याचबरोबर दुखापतग्रस्त यष्टीरक्षक ऋषभ पंतची पोकळी भरून काढणे संघासाठी कठीण होत आहे. संघातील यष्टीरक्षकासाठी मंथन सुरू आहे. केएस भरत आणि ईशान किशन यांच्यात एकाला संधी दिली जाऊ शकते, असे मानले जात आहे. फिरकी विकेटवर केएल राहुलला विकेटच्या मागे घेऊन संघ कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही, असे मानले जाते. यासाठी रेकॉर्डनुसार केएस भरत यांचा दावा मजबूत मानला जात आहे. आंध्र प्रदेशचा यष्टिरक्षक फलंदाज श्रीकर भरतने 86 सामन्यांच्या 135 डावात 11 वेळा नाबाद राहताना 4707 धावा केल्या आहेत. यामध्ये 308 धावा ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

हेही वाचा : ICC Mens Player of The Month : 'आयसीसी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ'ची घोषणा; दोन भारतीय खेळाडूंचा समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.