ETV Bharat / sports

Mandhana Injury : भारताची सलामीवीर मंधाना टी-20 विश्वचषकाच्या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता; पाहा नेमके काय कारण

author img

By

Published : Feb 10, 2023, 6:54 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना 26 वर्षीय सलामीवीराच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे 12 फेब्रुवारी होणाऱ्या सामन्याला ती मुकण्याची शक्यता आहे.

Mandhana doubtful starter for India's T20 World Cup opener against Pakistan
भारताची सलामीवीर मंधाना टी-20 विश्वचषकाच्या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता; पाहा नेमके काय कारण

केपटाऊन : भारताची उपकर्णधार स्मृती मानधना रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सलामीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. कारण सराव सामन्यादरम्यान तिला झालेल्या बोटाच्या दुखापतीतून ती अद्याप सावरली नाही. 26 वर्षीय मंधाना सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना तिच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामधून ती फिट झाली नाही. त्यामुळे ती पहिल्या सामन्यात खेळण्यास असमर्थ असण्याची शक्यता आहे.

ती अजूनसुद्धा विश्वचषकातून बाहेर : तिला सराव सामन्यात दुखापत झाली. ती अजूनसुद्धा विश्वचषकातून बाहेर आहे, असे आम्ही म्हणू शकत नाही. पण, ती पाकिस्तानचा सामना चुकवू शकते," असे आयसीसीच्या सूत्राने पीटीआयला सांगितले. तिच्या नेहमीच्या सलामीच्या स्थानाऐवजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करीत होती. तिची खेळी फक्त तीन चेंडू चालली.

दुखापतीमुळे दुसरा सराव सामना मंधानाने गमावला : त्यानंतर बुधवारी बांगलादेशविरुद्धचा भारताचा दुसरा सराव सामना मंधानाने गमावला होता. कर्णधार हरमनप्रीत कौरचा फिटनेसही चिंतेचा विषय आहे. गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात तिच्या खांद्याला दुखापत झाली होती.

मधल्या फळीतील मोठ्या फलंदाजांनी खेळी केली नाही : फायनलनंतर कौर म्हणाली, "शरीर ठीक आहे. विश्रांती घेतल्याने बरे होईल." मात्र, मधल्या फळीतील मोठ्या फलंदाजाने भारताच्या एकाही सराव सामन्यात फलंदाजी केली नाही. 'वुमन इन ब्ल्यू' गट 'ब' मध्ये इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यासोबत आहेत.

स्मृती मंधानाची दमदार खेळीने वेस्ट इंडिजचा पराभव : महिलांच्या तिरंगी राष्ट्रीय T20 मालिकेत टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा सलग दुसरा पराभव केला. भारताने वेस्ट इंडिजचा 56 धावांनी पराभव केला. भारताकडून स्मृती आणि हरमनप्रीतने दमदार खेळी करीत विजय खेचून आणला. 28 जानेवारीला भारताची दक्षिण आफ्रिकेशी लढत होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या महिलांच्या तिरंगी मालिकेत भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चुरशीची लढत झाली. या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजचा पराभव केला. या सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाने स्पर्धेतील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 56 धावांनी पराभव करताना भारताच्या हरमनप्रीत आणि स्मृती जोडीने दमदार खेळी केली.

हेही वाचा : Ravindra Jadeja Ball Tampering : रवींद्र जडेजा विरुद्धच्या आरोपांवर टीम इंडियाचे मॅच रेफरींना चोख उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.