ETV Bharat / sports

Thomas Cup 2022 : 14 वेळा चॅम्पियन राहिलेल्या इंडोनेशियाचा पराभव करत भारताने थॉमस चषक जिंकला

author img

By

Published : May 15, 2022, 5:02 PM IST

Updated : May 15, 2022, 5:55 PM IST

भारताने थॉमस कप 2022 चे विजेतेपद पटकावले आहे. 14 वेळच्या विजेत्या इंडोनेशियाचा पराभव करून भारताने प्रथमच थॉमस कप जिंकला आहे.

India beat Indonesia
India beat Indonesia

नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटन संघाने रविवारी इतिहास रचला. थॉमस कपच्या अंतिम सामन्यात भारताने 14 वेळचा चॅम्पियन संघ इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. या संघाला पराभूत करून ( India beat Indonesia ) भारताने इतिहास रचला आणि थॉमस चषकाचे विजेतेपद प्रथमच पटकावले.

भारतासाठी लक्ष्य सेनने ( Lakshya Sen ) इंडोनेशियाच्या अँथनी गिंटिंगचा 21-8, 17-21, 16-21 असा पराभव करून संघाला 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. यानंतर दुहेरीत भारताच्या सात्विक आणि चिराग जोडीने ( Satvik and Chirag ) धमाकेदार खेळ दाखवत 18-21, 23-21, 21-19 असा विजय मिळवत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात के श्रीकांतने जोनाथनचा सरळ गेममध्ये 21-15, 23-21 असा पराभव करत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून देत ऐतिहासिक विजय मिळवला.

गतविजेत्या इंडोनेशियाचा या स्पर्धेत मोठा विक्रम असून सध्याच्या स्पर्धेत हा संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. भारतीय पुरुष संघाने मात्र मलेशिया आणि डेन्मार्कसारख्या संघांना पराभूत करून प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला आणि कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आपल्यात असल्याचे दाखवून दिले. भारतासाठी हा ऐतिहासिक क्षण होता. चांगल्या मानांकन असलेल्या संघाविरुद्ध भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नव्हती आणि गेल्या दोन सामन्यांमध्ये पिछाडीवर पडूनही संघाने मानसिक ताकद दाखवून विजय मिळवला.

इंडोनेशियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही, तर भारताला समूह टप्प्यात चायनीज तैपेईविरुद्ध एकमेव पराभव पत्करावा लागला. बाद फेरीत इंडोनेशियाने जपानला पराभूत केले, तर भारताने माजी पाच वेळा चॅम्पियन मलेशिया आणि 2016 चे विजेते डेन्मार्कचा पराभव केला. भारताचे स्टार पुरुष खेळाडू किदाम्बी श्रीकांत आणि एसएस प्रणॉय यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि आतापर्यंतचे सर्व पाच सामने जिंकले आहेत. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनेही प्रभावी कामगिरी केली आहे.

  • The Indian badminton team has scripted history! The entire nation is elated by India winning the Thomas Cup! Congratulations to our accomplished team and best wishes to them for their future endeavours. This win will motivate so many upcoming sportspersons.

    — Narendra Modi (@narendramodi) May 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कृष्ण प्रसाद गारगा आणि विष्णुवर्धन गौड पंजाला ही युवा जोडी कमकुवत दुवा ठरली पण मलेशिया आणि डेन्मार्कविरुद्धच्या पराभवादरम्यान त्यांनी कडवी झुंज दिली. भारत पुन्हा एकदा एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांना दुहेरीची दुसरी जोडी म्हणून अंतिम फेरीत उतरवू शकतो. या जोडीने राऊंड रॉबिन स्वरूपात दोन सामने खेळले, एक जिंकला आणि दुसरा हरला.

  • India winning the Thomas Cup is truly commendable! Congratulations to the Indian Badminton team for this historic win achieved with indomitable courage and hard work. pic.twitter.com/Xt3DI9vD2F

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) May 15, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

स्पर्धेच्या सुरुवातीला अन्नातून विषबाधा झालेल्या जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानावर असलेल्या लक्ष्य सेनने चांगली कामगिरी केली आहे, परंतु गेल्या दोन सामन्यांमध्ये तो संघाला सकारात्मक सुरुवात करण्यात अपयशी ठरला आहे.

भारतीय एकेरी संघ: लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय, प्रियांशू राजावती यांचा सहभाग होता.

भारतीय दुहेरी संघ: सात्विकसाईराज रँकीरेड्डी-चिराग शेट्टी, विष्णुवर्धन गौर पंजाला-कृष्ण प्रसाद गरगा, एमआर अर्जुन-ध्रुव कपिला यांचा समावेश होता.

हेही वाचा -Andrew Symonds Dies : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

Last Updated : May 15, 2022, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.