ETV Bharat / sports

मँचेस्टर कसोटी रद्द वाद : पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भारतीय खेळाडूंनी मास्क घातला नव्हता - दिलीप दोशी

author img

By

Published : Sep 15, 2021, 4:50 PM IST

लंडनमध्ये झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला भारतीय खेळाडू विनामास्क हजर होते, असा दावा भारतीय संघाचे माजी खेळाडू दिलीप दोशी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

why-the-fifth-test-match-between-ind-vs-eng-was-canceled-former-cricketer-dilip-doshi-told-reason
मँचेस्टर कसोटी रद्द वाद : पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भारतीय खेळाडूंनी मास्क घातला नव्हता - दिलीप दोशी

नवी दिल्ली - भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना अचानक रद्द करण्यात आला. इंग्लंडच्या माध्यमानी याबाबत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जबाबदार धरले. शास्त्री लंडनमध्ये एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला गेले होते. यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आता या प्रकरणी भारताचे माजी क्रिकेट दिलीप दोशी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय खेळाडू लंडनमध्ये झालेल्या त्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला विनामास्क हजर होते, असा दावा दोशी यांनी केला आहे.

भारतीय खेळाडूंनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी मागितली नव्हती, असे बीसीसीआयने नुकतेच सांगितलं आहे. यादरम्यान दिलीप दोशी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी दावा केला आहे की, खेळाडू त्या कार्यक्रमात विनामास्क हजर होते. काही खेळाडू कार्यक्रमातील गर्दी पाहून पाच दहा मिनिटात तिथून निघून गेल्याचे देखील दोशी यांनी सांगितलं.

इंडिया अहेडच्या हवाल्याने दिलीप दोशी यांनी म्हटलं की, मी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हजर होतो. मला वास्तविक ताज ग्रुपकडून आमंत्रित करण्यात आले होते. खूप सारे सन्मानिय व्यक्ती आणि भारतीय संघातील काही खेळाडू थोड्या वेळासाठी या कार्यक्रमाला हजर होते. पण मी त्यांना पाहून आश्चर्यचकित झालो. कारण खेळाडूंमध्ये एकाने देखील मास्क घातलेला नव्हता.

सार्वजनिक ठिकाणी मास्क घालवा किंवा नाही, हे राजकीय नेते ठरवतात. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी निर्णय घेतला आहे की, डबल वॅक्सिनेशन कार्यक्रमामुळे इंग्लंड सुरक्षित आहे आण खूप साऱ्या लोकांनी लस घेतली आहे. पण मी स्वत:ला संक्रमणापासून रोखण्यासाठी मास्क घालतो, असे देखील दोषी यांनी सांगितलं. आयपीएल देखील ओल्ड ट्रेफोर्ड येथील सामना रद्द होण्याचे कारण असून शकते, असा अंदाज देखील दिलीप दोषी यांनी व्यक्त केला.

दरम्यान, उभय संघातील पाचवा कसोटी सामना भारतीय संघाचे ज्यूनियर फिजिओ योगेश पारमार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रद्द करण्यात आला. नाणेफेकीच्या आधी भारतीय संघाने सामना खेळण्यासाठी नकार दिला होता. या विषयावरून इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी बीसीसीआयसह भारतीय खेळाडूंना धारेवर धरलं आहे.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कची क्रिकेटर पत्नी एलिसा हिलीची रोहित शर्मावर नजर

हेही वाचा - ICC T20 Rankings: विराट कोहलीला एका स्थानाचा फायदा, क्विंटन डी कॉकची मोठी झेप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.