ETV Bharat / sports

Cricketer Avesh Khan : आवेश खानने आपल्या चमकदार कामगिरीचे श्रेय 'या' व्यक्तिला दिले

author img

By

Published : Jun 18, 2022, 7:40 PM IST

राजकोटमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर 82 धावांनी विजय मिळवला. वेगवान गोलंदाज आवेश खानने 18 धावांत 4 बळी घेतले. सामन्यातील विजयाबाबत आवेश खान म्हणाला, या विजयाचे श्रेय एका खास व्यक्तीला जाते.

Avesh Khan
Avesh Khan

राजकोट : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी राहुल द्रविडने म्हटले होते की, संधी मिळालेल्या लोकांपैकी तो एक आहे. ते खेळाडूंना वेळ देतात आणि त्यांचा उत्साह वाढवण्यावर विश्वास ठेवतीत, असे आवेश खान ( Fast bowler Avesh Khan ) म्हणाला. पहिले दोन सामने गमावले तरी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. राहुल द्रविडने ( Coach Rahul Dravid ) सर्वांवर विश्वास ठेवला. त्याचबरोबर खेळाडूंनी देखील आपल्याकोच सविश्वास सार्थ ठरवला.

राजकोटमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेवर 82 धावांनी विजय ( India beat South Africa by 82 runs ) मिळवला. या सामन्यात वेगवान गोलंदाज आवेश खानने 18 धावांत 4 बळी घेतले. विजयाबाबत आवेश खान म्हणाला, चार सामन्यांत संघ बदलला नाही, त्यामुळे याचे श्रेय राहुल (द्रविड) सरांना जाते. ते प्रत्येकाला संधी देतात आणि त्यांना दीर्घकाळ देण्याचा मानस आहे. एक किंवा दोन खराब कामगिरीनंतर ते खेळाडूला वगळत नाहीत. कारण एक किंवा दोन सामन्यांच्या आधारे तुम्ही खेळाडूचा न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेसे सामने मिळत आहेत.

सामना संपल्यानंतर आवेश खान म्हणाला, होय, माझ्यावर दबाव होता. मी तीन सामन्यांत एकही विकेट घेतली नाही, पण राहुल सर आणि संघ व्यवस्थापनाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी चार विकेट घेतल्या. माझ्या वडिलांचाही वाढदिवस आहे, त्यामुळे त्यांच्यासाठीही ही भेट आहे.

हेही वाचा - Ranji Trophy Final : मुंबईचा संघ विक्रमी 47व्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.