ETV Bharat / sports

SRH New Head Coach : सनरायझर्सला मिळाले नवे हेड कोच, न्यूझीलंडच्या 'या' दिग्गज खेळाडूची नियुक्ती

author img

By

Published : Aug 7, 2023, 7:31 PM IST

Updated : Aug 7, 2023, 7:38 PM IST

सनरायझर्स हैदराबादने ब्रायन लारा यांच्या जागी न्यूझीलंडचे दिग्गज फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. आयपीएलच्या गेल्या हंगामात हैदराबादची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

SRH New Head Coach
सनरायझर्स हैदराबाद मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी न्यूझीलंडचे माजी दिग्गज फिरकीपटू डॅनियल व्हिटोरी यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. व्हिटोरी वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार ब्रायन लारा यांची जागा घेणार आहेत.

आयपीएल 2023 मध्ये हैदराबादची खराब कामगिरी : आयपीएल 2023 मधील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर हैदराबादने लाराला प्रशिक्षक पदावरून हटविले. 2023 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. साखळी टप्प्यातील 14 सामन्यांपैकी केवळ 4 सामने जिंकून संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर राहिला. यामुळे आता सनरायझर्स हैदराबादने नव्या हंगामासाठी आपले मुख्य प्रशिक्षक बदलले आहेत.

  • As our 2 year association with Brian Lara comes to an end, we bid adieu to him 🧡

    Thank you for the contributions to the Sunrisers. We wish you all the best for your future endeavours 🙌 pic.twitter.com/nEp95pNznT

    — SunRisers Hyderabad (@SunRisers) August 7, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

व्हिटोरी होते आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक : सनरायझर्स हैदराबादचे नवे प्रशिक्षक डॅनियल व्हिटोरी यांनी याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद भूषवले आहे. तसेच ते 2014 ते 2018 या कालावधीत आरसीबीचे मुख्य प्रशिक्षकही राहिले आहेत. व्हिटोरी सध्या ऑस्ट्रेलियन पुरुष संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. व्हिटोरी यांच्यावर सनरायझर्स हैदराबाद संघाने गमावलेली लय परत आणण्यासोबतच संघाला चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी असेल. आयपीएलच्या गेल्या सहा हंगामात हैदराबादने पाचव्यांदा मुख्य प्रशिक्षक बदलला आहे. आयपीएल 2023 पूर्वी ब्रायन लारा यांनी टॉम मूडीची जागा घेतली होती.

2016 नंतर कामगिरी घसरली : सनरायझर्स हैदराबादने 2016 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्यावेळी संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरकडे होते, तर टॉम मूडी हे मुख्य प्रशिक्षक होते. त्या हंगामानंतर संघाची कामगिरी घसरली. 2020 मध्ये हा संघ शेवटचा प्लेऑफमध्ये पोहोचला होता.

व्हिटोरी यांच्यासमोर संघाच्या पुनर्बांधणीचे आव्हान : आयपीएल 2023 मध्ये संघ पूर्णपणे विखुरलेला दिसत होता. खेळाच्या प्रत्येक विभागात संघाने खराब कामगिरी केली. आता नवे मुख्य प्रशिक्षक व्हिटोरी यांच्यासमोर लिलावात नव्या खेळाडूंची निवड करून संघाची पुनर्बांधणी करण्याचे आव्हान आहे. प्रशिक्षक म्हणून व्हिटोरीने आरसीबीला 2015 मध्ये प्लेऑफ आणि 2016 मध्ये अंतिम फेरीत पोहचवले होते, हे विशेष.

हेही वाचा :

  1. RCB Head Coach : आरसीबीला मिळाले नवे हेड कोच, बांगर-हसन जोडीची हकालपट्टी
  2. India Vs Pakistan : मोठी बातमी! विश्वचषकात रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार, सरकारकडून ग्रीन सिग्नल
  3. Sachin Tendulkar : क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! पुन्हा एकदा रंगणार सचिन विरुद्ध अख्तर सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे
Last Updated : Aug 7, 2023, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.