ETV Bharat / sports

Kohli praises pant and pandya : पंत आणि पंड्याच्या शानदार फलंदाजीचे कोहलीकडून कौतुक

author img

By

Published : Jul 18, 2022, 4:28 PM IST

हार्दिक पांड्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना 24 धावांत चार बळी घेतले आणि त्यानंतर 71 धावांचे अर्धशतक केले. त्याचवेळी ऋषभ पंतने 113 चेंडूत 16 चौकार आणि 2 षटकार ठोकले. या दोघांच्या कामगिरीसह विराट कोहलीने टीम इंडियाचे कौतुक ( Kohli praises pant and pandya ) केले.

Virat Kohli
विराट कोहली

मँचेस्टर : ऋषभ पंतच्या मास्टरक्लास आणि हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू ( All-rounder Hardik Pandya ) कामगिरीनंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने संघाच्या कामगिरीचे कौतुक केले ( Virat Kohli praises pant and pandya ) आहे. भारतीय संघाने रविवारी मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 2-1 असा विजय नोंदवला. एका वेळी भारतीय संघ 38 धावांवर होता, जिथे त्यांनी त्यांच्या तीन प्रमुख खेळाडूंच्या विकेट गमावल्या होत्या. ज्यात कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन आणि कोहली यांच्या विकेट्सचा समावेश होता.

तीन प्रमुख खेळाडूंच्या विकेट्स गमावल्यानंतर, संघाच्या इतर फलंदाजांनी सर्वोत्तम खेळी खेळली, जिथे पंड्याने पंतसह 115 चेंडूत 133 धावांची भागीदारी केली. तसेच स्वतः 55 चेंडूत 71 धावा आणि गोलंदाजी करताना 4 विकेट्ल घेतल्या. कोहलीने कु अॅपवर पोस्ट करताना ( Kohli post on Ku App after win ) टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा करताना कॅप्शनमध्ये लिहिले, शानदार धावांचा पाठलाग आणि शानदार मालिका. त्याचवेळी मोहम्मद शमीनेही तिसऱ्या वनडेतील विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले. कु अॅपवर शमी म्हणाला, संघाचे अभिनंदन.

चांगल्या खेळाडूंनी टी-20, एकदिवसीय मालिका जिंकली. त्याचवेळी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण ( Former cricketer VVS Laxman ) म्हणाला की पंत आणि पंड्या यांच्यातील भागीदारीमुळे भारताला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये पुनरागमन करण्यात मदत झाली. इंग्लंडचा डाव 46 व्या षटकात 259 धावांवर आटोपला आणि भारताने 42.1 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करून मालिका 2-1 ने जिंकली. या दरम्यान पंतने आपले पहिले एकदिवसीय शतक ( Rishabh Pant first ODI century ) झळकावून भारताला विजय मिळवून दिला.

हेही वाचा - Jos Buttler Statement : मी अनुभवी क्रिकेटर आहे, पण मी एक तरुण कर्णधार जोस बटलर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.