ETV Bharat / sports

IND vs WI 3rd ODI: भारताचा एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजविरोधात 200 धावांनी विजय, कर्णधार हार्दिकने दिली प्रतिक्रिया

author img

By

Published : Aug 2, 2023, 8:26 AM IST

Updated : Aug 2, 2023, 12:40 PM IST

तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडिजवर 200 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली आहे. सामना झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने संघाच्या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या तिसऱ्या सामन्यात भारताच्या चार फलंदाजांनी अर्धशतके केली आहे. कर्णधार हार्दिक पांड्याने कप्तानी खेळी करत मोठी वेस्ट इंडिजसमोर धावांचा डोंगर उभा केला.

भारताने जिंकली एकदिवसीय मालिका
भारताने जिंकली एकदिवसीय मालिका

तौराबा: भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 200 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. या विजयासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली आहे.दरम्यान संघाचा विजय झाल्यानंतर आनंदीत झालेल्या कर्णधाराने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला अशा सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवण्यास आवडते, अशी प्रतिक्रिया कर्णधार हार्दिक पांड्याने दिली.

नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने भारताला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. याचा फायदा घेत भारतीय संघाने वेस्ट इंडिजच्या संघासमोर 351 धावांचा डोंगर उभारला. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ फक्त 151 धावा करू शकला. भारतीय गोलंदाज शार्दूल ठाकूरने 4 गडी बाद केले. तर मुकेश कुमारने 3 गडी बाद केले. कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या आहेत.

काय म्हणाला हार्दिक: भारताचा स्टँड-इन कर्णधार हार्दिक पंड्याने खुलासा केला की त्याला ज्या सामन्यांमध्ये धोके असतात, अशा प्रकारच्या सामन्यांचे नेतृत्व करणे आवडते.

हा एक विशेष विजय आहे. खरे सांगायचे तर, मी कर्णधार म्हणून अशा प्रकारच्या खेळांची वाट पाहतो की जेथे काहीतरी धोका आहे. परंतु हा सामना एखाद्या आंतरराष्ट्रीय खेळापेक्षा मोठा होता. कराण आम्ही पराभूत झालो असतो तर आमच्यापुढे काय धोका होता ते माहिती होते. परंतु खेळाडूंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. त्यांनी देखील याचा आनंद घेतला. दबावाच्या परिस्थितीचा आनंद घेणे देखील महत्त्वाचे आहे. दरम्यान विराट आणि रोहित हे संघाचे अविभाज्य भाग आहेत. पण ऋतुराज गायकवाडसारख्यांना संधी मिळावी म्हणून त्यांना विश्रांती देणे महत्त्वाचे होते-कर्णधार हार्दिक पांड्या

वेस्ट इंडिजचे स्वप्न तुटले: भारताने दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाने नांगी टाकली. विडिंजचा संपूर्ण डाव 151 धावांत संपुष्टात आला. यामुळे मालिका जिंकण्याचे वेस्ट इंडिजचे 17 वर्षांपासूनचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिले आहे. कारण वेस्ट इंडिजने यापूर्वी भारताविरुद्ध वनडे मालिका ही 2006 साली जिंकली होती. काल खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी दोन्ही संघ 1-1अशा स्थितीत होते. त्यामुळे वेस्ट इंडिजला मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी होती. परंतु तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव झाला.

खराब फलंदाजी: भारताने धावांचा डोंगर उभारल्यानंतर या आव्हानाचा डोंगर पार करताना वेस्ट इंडिजच्या संघाची दमछाक झाली. भारताच्या भेदक माऱ्यापुढे इंडिजचा संघ तग धरू शकला नाही. इंडिज संघाच्या अवघ्या 88 धावा होईपर्यंत 8 फलंदाज तंबूमध्ये परतले होते. खालच्या क्रमांकातील खेळाडूंनी चांगली फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यांच्या फलंदाजीमुळे वेस्ट इंडिज संघाला 151 धावांपर्यंत मजल मारता आली. आघाडीच्या फलंदाजात फक्त एलिक एथांजेने मोठी खेळी केली. एलिक एथांजेने 32 धावांची खेळी केली. त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाच मोठी धावसंख्या उभारता आली नाही. खालच्या क्रमांकातील गुडाकेश मोटी याने नाबाद राहत 39 धावा केल्या. तर अल्जारी जोसेफ याने 26 धावा केल्या.

मुकेश कुमारची जबरदस्त कामगिरी: मुकेश कुमारने वेस्ट इंडिजला एकानंतर एक असे 3 धक्के दिले. मुकेश कुमारने पहिल्याच षटकात मुकेशने वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रेंडन किंगला बाद केले. त्याच्या रुपाने वेस्ट इंडिजला पहिला धक्का मिळाला त्यानंतर मुकेशने कायले मेयर्सला फक्त 4 धावांवर बाद केले. त्यानंतर कर्णधार शाय होपला अवघ्या 5 धावात बाद केले. होपला बाद केल्यानंतर भारताच्या विजयाच्या होर्प्स वाढल्या. मुकेशने 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17.25 च्या सरासरीने आणि 4.60 च्या इकॉनॉमी रेटने 4 बळी घेतले. या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने वनडेमध्ये पदार्पण केले.

चार फलंदाजांची अर्धशतके: नाणेफेक वेस्ट इंडिजने जिंकली होती. त्यांनी भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. त्यानंतर भारतीय सलामीवीर फलंदाज ईशान किशन आणि शुभमन गिलने दमदार सुरुवात केली. गिलने सर्वाधिक 85 धावा केल्या. ईशान किशनने यावेळी सलग तिसरे अर्धशतक ठोकले. ईशानने या सामन्यात 77 धावांची दमदार खेळी साकारली. संजू सॅमसनने संधीचे सोने करत 41 चेंडूंत 51 धावांची तुफानी फलंदाजी केली. भारताचा कर्णधार हार्दिक पंड्यानेही अर्धशतक केले. हार्दिकने 52 चेंडूंत 4 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद राहत 70 धावा ठोकल्या. हार्दिकच्या या खेळीच्या जोरावर भारताने 350 धावांचा पल्ला ओलांडला.

हेही वाचा-

  1. Jasprit Bumrah : अखेर प्रतीक्षा संपली!, जसप्रीत बुमराहचे टीम इंडियात धडाक्यात पुनरागमन
  2. Stuart Broad Retirement : युवराज सिंगने 6 षटकार ठोकलेल्या गोलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, युवी म्हणाला..
Last Updated : Aug 2, 2023, 12:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.