ETV Bharat / sports

''अतूट धैर्याचे प्रतिक'', लक्ष्मणने केले युवराजचे कौतुक

author img

By

Published : Jun 7, 2020, 4:32 PM IST

युवराजचा ट्विटरवर फोटो पोस्ट करत लक्ष्मण म्हणाला, "कर्करोगावर मात करून अनेकांचे प्रेरणास्थान बनलेल्या युवराजसिंगने 2011 वर्ल्ड कपमध्ये आजारी असूनही संघांची जबाबदारी खांद्यावर घेतली. आजारातून बरे झाल्यानंतरही त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट धावा केल्या. हे त्याच्या अतूट धैर्याचे प्रतिक आहे."

vvs laxman salutes yuvraj's unwavering courage
''अतूट धैर्याचे प्रतिक'', लक्ष्मणने केले युवराजचे कौतुक

नवी दिल्ली - माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराजसिंगचे कौतुक केले आहे. लक्ष्मण सध्या ट्विटरवर दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो पोस्ट करत असून तो आपली प्रतिक्रिया देत आहे. युवराजने कर्करोगासारख्या आजाराशी झुंज देऊन 2011 मध्ये भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. युवराजची या स्पर्धेत 'मालिकावीर' म्हणून निवड झाली होती.

युवराजचा ट्विटरवर फोटो पोस्ट करत लक्ष्मण म्हणाला, "कर्करोगावर मात करून अनेकांचे प्रेरणास्थान बनलेल्या युवराजसिंगने 2011 वर्ल्ड कपमध्ये आजारी असूनही संघांची जबाबदारी खांद्यावर घेतली. आजारातून बरे झाल्यानंतरही त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट धावा केल्या. हे त्याच्या अतूट धैर्याचे प्रतिक आहे."

  • An inspiration to many through his successful conquest of cancer,it’s scarcely believable that @YUVSTRONG12 carried the team on his shoulders at the 2011 World Cup when gravely unwell. That he registered his highest ODI score after his recovery is tribute to his unwavering spirit pic.twitter.com/cRUBAGdBCu

    — VVS Laxman (@VVSLaxman281) June 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

2017 मध्ये युवराजने इंग्लंडविरुद्ध कटक येथे 21 चौकार आणि तीन षटकारांसह 150 धावांची शानदार खेळी खेळली. 2007 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत युवराज सिंगने आक्रमक फलंदाजी केली होती. या स्पर्धेत त्याने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे.

युवराजने 10 जून 2019ला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषीत केली. युवराजने भारताकडून 304 एकदिवसीय सामने, 40 कसोटी आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.