ETV Bharat / sports

गांगुली, धोनी, नव्हे तर 'या' फिरकीपटूला गंभीरने म्हटले भारताचा सर्वोत्तम कर्णधार

author img

By

Published : Apr 22, 2020, 5:07 PM IST

गंभीर एका कार्यक्रमात म्हणाला, "जर मी विक्रमाबद्दल बोललो तर मी धोनीचे नाव घेईन, परंतु मी ज्या कर्णधारांसह खेळलो आहे त्यातील अनिल कुंबळे हा सर्वोत्कृष्ट कर्णधार होता. सौरभने एक अद्भुत कामगिरी केली. परंतु एक खेळाडू जो मला जास्त काळ संघ म्हणून पाहण्यास आवडेल तो अनिल कुंबळे आहे.''

Kumble best captain i played under said gautam gambhir
गांगुली, धोनी, नव्हे तर 'या' फिरकीपटूला गंभीरने म्हटले भारताचा सर्वोत्तम कर्णधार

नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे हा संघाचा सर्वोत्तम कर्णधार होता, ज्याच्या नेतृत्वात मी खेळलो होतो, असे विधान माजी सलामीवीर गौतम गंभीरने केले आहे. गंभीर सौरभ गांगुली आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातही खेळला आहे, पण जेव्हा सर्वोत्कृष्ट कर्णधारांची निवड करण्याची वेळ आली तेव्हा त्याने कुंबळेचे नाव घेतले आहे.

गंभीर एका कार्यक्रमात म्हणाला, "जर मी विक्रमाबद्दल बोललो तर मी धोनीचे नाव घेईन, परंतु मी ज्या कर्णधारांसह खेळलो आहे त्यातील अनिल कुंबळे हा सर्वोत्कृष्ट कर्णधार होता. सौरभने एक अद्भुत कामगिरी केली. परंतु एक खेळाडू जो मला जास्त काळ संघ म्हणून पाहण्यास आवडेल तो अनिल कुंबळे आहे. मी त्याच्या कर्णधारपदाच्या काळात कदाचित सहा कसोटी सामने खेळलो आहे. जर तो बराच काळ खेळला असता तर त्याने अनेक विक्रम मोडले असते.''

2007 मध्ये राहुल द्रविडकडून कुंबळेने संघाचे नेतृत्व स्वीकारले. त्याने 14 कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून कुंबळेच्या नेतृत्वात भारताने तीन सामने जिंकले, सहा गमावले आणि पाच सामने ड्रॉ केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.