ETV Bharat / sitara

हॉलिवूडच्या जॅकी चॅन यांना मागे टाकत 'खिलाडी' बनला सर्वात महागडा अभिनेता

author img

By

Published : Aug 22, 2019, 3:12 PM IST

'फोर्ब्स'ने जाहीर केलेल्या यादीनुसार, अक्षय कुमार जगातील सर्वात महागड्या अभिनेत्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तर, जॅकी चॅन यांनी पाचव्या क्रमाकांवर स्थान मिळवले.

हॉलिवूडच्या जॅकी चन यांना मागे टाकत 'खिलाडी' बनला सर्वात महागडा अभिनेता


मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळेच त्याच्याकडे निर्मात्यांच्या रांगा लागल्या आहेत. अक्षयची लोकप्रियता पाहता त्याच्या मानधनातही वाढ झाली आहे. त्यामुळेच बॉलिवूडच्या खानांना मागे टाकत अक्षय कुमार सर्वात महागडा अभिनेता बनला आहे. याशिवाय हॉलिवूडच्या जॅकी चॅन यांनाही त्याने मागे टाकले आहे.

होय, 'फोर्ब्स'ने जाहीर केलेल्या यादीनुसार, अक्षय कुमार जगातील सर्वात महागड्या अभिनेत्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. तर, जॅकी चॅन यांनी पाचव्या क्रमाकांवर स्थान मिळवले.

हॉलिवूडचा अभिनेता डॉयन जोन्हसो (Dwayne johnso) हा जगातील सर्वात महागड्या अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे मानधन हे तब्बल ८९.४ मिलियन डॉलर एवढे आहे.

  • Forbes has come up with the highest-paid actors - 2019 list and it features Akshay Kumar [$ 65 mn earnings] at No 4 position... The Rock [$ 89.4 mn], Chris Hemsworth [$ 76.4 mn] and Robert Downey Jr [$ 66 mn] occupy the Top 3 positions.

    — taran adarsh (@taran_adarsh) August 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फोर्ब्सच्या यादीतले टॉप १० अभिनेते

  • डॉयन जोन्हसो (Dwayne Johnson $89.4 million)
  • ख्रिस हेम्सवर्थ (Chris Hemsworth $76.4 million)
  • रॉबर्ट डाऊनी (Robert Downey Jr. $66 million)
  • अक्षय कुमार (Akshay Kumar $65 million)
  • जॅकी चॅन (Jackie Chan $58 million)
  • बार्डले कूपर (Bradley Cooper $57 million)
  • अॅडम सॅन्डलर (Adam Sandler $57 million)
  • ख्रिस इव्हान्स (Chris Evans $43.5 million)
  • पॉल रुड (Paul Rudd $41 million)
  • विल स्मिथ (Will Smith $35 million)

अलिकडेच अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले आहे. आता तो 'सूर्यवंशी', 'लक्ष्मी बाँब' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.