ETV Bharat / sitara

'हाऊसफुल ४' नंतर अक्षय कुमारचा 'हाऊसफूल ५'कडे इशारा?

author img

By

Published : Nov 25, 2019, 7:26 PM IST

अक्षय कुमारनेच हाऊसफुलच्या संपूर्ण टीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच 'हाऊसफुल ५'कडे इशाराही दिला आहे.

'हाऊसफुल ४' नंतर अक्षय कुमारचा 'हाऊसफूल ५'कडे इशारा?

मुंबई - चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्या 'हाऊसफुल' सीरिजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. मागच्याच महिन्यात 'हाऊसफुल ४' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळाले आहे. त्यामुळेच आता चित्रपटाचा पाचवा भागही प्रदर्शित होणार असल्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत.

अक्षय कुमारनेच हाऊसफुलच्या संपूर्ण टीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच 'हाऊसफुल ५'कडे इशाराही दिला आहे. या फोटोमध्ये अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, कृती सेनॉन, बॉबी देओल, क्रिती खरबंदा, जॅकलिन फर्नांडीस, वर्धा नाडियाडवाला, चंकी पांडे, पुजा हेगडे, साजिद नाडियाडवाला आणि फरहाद समजी यांचा समावेश आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, अक्षय कुमार आता 'बच्चन पांडे', 'गुड न्यूज', 'बेल बॉटम', 'लक्ष्मी बाँब' आणि 'सूर्यवंशी' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर अक्षय पर्व पाहायला मिळेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Intro:Body:

'हाऊसफुल ४' नंतर अक्षय कुमारचा 'हाऊसफूल ५'कडे इशारा?

मुंबई - चित्रपट निर्माते साजिद नाडियाडवाला यांच्या 'हाऊसफुल' सीरिजला प्रेक्षकांचा तुफान प्रतीसाद मिळाला आहे. मागच्याच महिन्यात 'हाऊसफुल ४' प्रदर्शित झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळाले आहे. त्यामुळेच आता चित्रपटाचा पाचवा भागही प्रदर्शित होणार असल्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत.

अक्षय कुमारनेच हाऊसफुलच्या संपूर्ण टीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच 'हाऊसफुल ५'कडे इशाराही दिला आहे. या फोटोमध्ये अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, कृती सेनॉन, बॉबी देओल, क्रिती खरबंदा, जॅकलिन फर्नांडीस, वर्धा नाडियाडवाला, चंकी पांडे, पुजा हेगडे, साजिद नाडियाडवाला आणि फरहाद समजी यांचा समावेश आहे.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, अक्षय कुमार आता 'बच्चन पांडे', 'गुड न्यूज', 'बेल बॉटम', 'लक्ष्मी बाँब' आणि 'सूर्यवंशी' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर अक्षय पर्व पाहायला मिळेल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.