ETV Bharat / sitara

पॉर्नोग्राफी प्रकरणात 60 दिवसाच्या तुरुंगवासानंतर राज कुंद्रा बाहेर

author img

By

Published : Sep 21, 2021, 5:05 PM IST

पॉर्नोग्राफी प्रकरणात ६० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर राज कुंद्राला सोमवारी ५० हजार रुपयांच्या जामिनावर जामीन मिळाला. मुंबई सत्र न्यायालयाने कुंद्रा आणि त्याचे सहआरोपी रायन थोरपे यांना जामीन मंजूर केला आहे. आज सकाळी त्याची कारागृहातून सुटका झाली आणि तो आपल्या घरी गेला.

तुरुंगवासानंतर राज कुंद्रा बाहेर
तुरुंगवासानंतर राज कुंद्रा बाहेर

मुंबई - उद्योगपती राज कुंद्रा दोन महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात ६० दिवस तुरुंगात राहिल्यानंतर राज कुंद्राला सोमवारी ५० हजार रुपयांच्या जामिनावर जामीन मिळाला. मुंबई सत्र न्यायालयाने कुंद्रा आणि त्याचे सहआरोपी रायन थोरपे यांना जामीन मंजूर केला आहे.

गुन्हा चुकीच्या आधारावर असल्याचा कुंद्राचा दावा

मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला जुलैमध्ये अटक केली होती. पोलिसांनी नुकतीच या प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यानंतर कुंद्राने नव्याने दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्याला पन्नास हजार रुपये जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा चुकीच्या आधारांवर असून केवळ शॉर्ट फिल्म्स तयार केल्या किंवा अपलोड केल्याचा पुरावा पोलिसांकडे नाही आणि आरोपपत्रात त्याचा उल्लेख नाही, असा दावा केला आहे. हॉटशॉट आणि बॉलीफेम अॅपमार्फत अश्लील कंटेंट प्रसारित केल्याचा आरोप पोलिसांनी कुंद्रावर ठेवला आहे. न्यायालयाने कुंद्राचा सहकारी रायन थॉर्पलाही जामीन मंजूर केला आहे.

60 दिवसाच्या तुरुंगवासानंतर राज कुंद्रा बाहेर

जामीनासाठी सुरू होती धडपड

१४६७ पानांचे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सहा दिवसांनी १५ सप्टेंबर रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याला मुख्य आरोपी म्हणून नामांकित केले. त्यानंतर लगेचच, कुंद्रा आणि थोरपे यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आणि सांगितले की आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे, जे पोलिस तपास संपल्याचे दर्शवते.

सहआरोपींना मिळाला होता जामीन

त्यांनी युक्तिवाद केला की नऊ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर, त्यापैकी आठ जणांना आधीच जामीन मिळाला आहे, त्यामुळे त्यांना गुन्ह्याच्या स्वरूपाच्या समानतेच्या आधारावर जामीनही दिला पाहिजे. राज कुंद्रा पुढे म्हणाला की तो एका कंपनीशी संबंधित होता ज्यात हॉटशॉट आणि बॉलीफेम अॅप्स फक्त १० महिने होते आणि तुरुंगात राहिल्यामुळे त्याला कोविड -१९ च्या संसर्गाचा धोका होता.

मढ आयलँडमधील बंगल्यावर पडला होता छापा

मालाड पश्चिममध्ये मालवणी पोलिसांनी एका बंगल्यावर छापा टाकून अॅपवर अश्लील साहित्य दाखवल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. या संदर्भात ५फेब्रुवारी रोजी पाच आरोपींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला.

शिल्पा शेट्टीचाही नोंदवला गेला जवाब

पाच महिन्यांच्या तपासानंतर, कुंद्रा आणि थोरपे यांनाही अटक करण्यात आली आणि तेव्हापासून दोघेही पोलिस आणि न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबई पोलिसांनी आपल्या पुरवणी आरोपपत्रात साक्षीदार म्हणून शिल्पा शेट्टीचा जवाब नोंदवला आहे.

हेही वाचा -'मर्दानी' म्हणणाऱ्या ट्रोलर्सना तापसी पन्नूने दिले चोख प्रत्युत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.