ETV Bharat / international

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबादमध्ये आंदोलन, सरकारने तैनात केले सैन्य

author img

By

Published : May 26, 2022, 7:44 AM IST

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख गुरुवारी पहाटे इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. "इस्लामाबाद कॅपिटल टेरिटरीमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीनुसार, सरकार, पाकिस्तानच्या राज्यघटनेच्या कलम 245 नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना, पुरेसे सैन्य तैनात करण्यास मान्यता देते," पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या सरकारी आदेशात ही माहिती दिली.

पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबादमध्ये आंदोलन
पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबादमध्ये आंदोलन

इस्लामाबाद (पाकिस्तान) : इम्रान खान यांनी काढलेल्या निषेध मोर्चामुळे वाढत्या अशांततेवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या शेहबाज शरीफ सरकारला रेड झोनच्या सुरक्षेसाठी लष्कराला पाचारण करावे लागले. कारण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख गुरुवारी पहाटे इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. "इस्लामाबाद कॅपिटल टेरिटरीमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीनुसार, सरकार, पाकिस्तानच्या राज्यघटनेच्या कलम 245 नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना, पुरेसे सैन्य तैनात करण्यास मान्यता देते," पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या सरकारी आदेशात ही माहिती दिली.

  • ہم پنجاب میں داخل ہوچکے ہیں اور انشاءاللہ اسلام آباد کی جانب بڑھیں گے۔ اس امپورٹڈ سرکار کی جانب سے جبر و فسطائیت کا کوئی بھی حربہ ہمیں ڈرا سکتاہے نہ ہی ہمارے مارچ کا رستہ روک سکتا ہے۔ #حقیقی_آزادی_مارچ pic.twitter.com/21snq9kG40

    — Imran Khan (@ImranKhanPTI) May 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी राजधनीत प्रवेश केल्यानंतर "महत्त्वाच्या सरकारी इमारतींचे रक्षण करण्यासाठी" पाकिस्तान सरकारने रेड झोनमध्ये सैन्य तैनात केले. राज्यघटनेच्या कलम 245 नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना, सरकार पाकिस्तान, पाकिस्तानी सैन्याच्या पुरेशा सैन्याच्या तैनातीला अधिकृत मान्यता देते," असे पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या सरकारी आदेशात म्हटले आहे. पाकिस्तानचे सर्वोच्च न्यायालय, संसद भवन, राष्ट्रपती कार्यालय, पंतप्रधान कार्यालय आणि इतर महत्त्वाच्या सरकारी इमारतींच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी आदेशात म्हटले आहे.

पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबादमध्ये आंदोलन
पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली इस्लामाबादमध्ये आंदोलन

डी-चौकाकडे जाण्यापासून अधिकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर पोलीस आणि पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये चकमकी झाल्यामुळे देशात तणाव निर्माण झाला. इम्रान खान यांनी बुधवारी इशारा दिला होता की शेहबाज शरीफ सरकारने नवीन निवडणुकांची तारीख जाहीर करेपर्यंत त्यांचे समर्थक डी-चौक सोडणार नाहीत. अविश्वासाच्या मताने सत्तेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी "सर्व पाकिस्तानींना" आपापल्या शहरात रस्त्यावर उतरण्यास सांगितले आहे. "खऱ्या स्वातंत्र्यासाठी" महिला आणि मुलांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. डॉन वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. पीटीआयच्या इस्लामाबादला निघालेल्या मोर्चात व्यत्यय आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अतिरेकीपणा केल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

"आमचा विश्वास आहे की सर्व नागरिकांना आणि सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचा आणि शांततेने निषेध करण्याचा अधिकार आहे," पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने असे (HRCP) ट्विट केले. "धकधपटशाहीने रस्त्यावरील हिंसाचार रोखण्यापेक्षा, मानवाधिकाराला चालना दिली पाहिजे. परिपक्व, लोकशाही स्वीकारण्याची आणि त्यातील गतिरोध संपवण्यासाठी त्वरित संवाद सुरू करण्याची जबाबदारी सरकार आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आहे," असेही त्यात पुढे म्हटले आहे.

पीटीआयच्या मोर्चावर बंदी घालण्याच्या शेहबाज शरीफ सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तान राजकीय संघर्षाकडे वाटचाल करत असल्याचं पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. डॉनच्या म्हणण्यानुसार, विरोधी नेत्यांवर कारवाई आणि राजधानी सील केल्याने अत्यंत अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने बुधवारी विद्यमान सरकारला इम्रान खानला अटक करण्यापासून रोखले आणि पीटीआयला इस्लामाबादच्या H-9 ग्राउंड परिसरात धरणे आंदोलन करण्यास परवानगी दिली. पीटीआयने शांततापूर्ण आंदोलन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आणि सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.