ETV Bharat / international

अफगाणिस्तान : औषधे व इतर मदतीच्या पुरवठ्यासाठी 'मानवतेचा सेतू' उभारावा; संयुक्त राष्ट्राचे आवाहन

author img

By

Published : Aug 23, 2021, 10:47 AM IST

Updated : Aug 23, 2021, 12:22 PM IST

अफगाणिस्तानातील लोकांना औषधे आणि इतर मदतीचे अखंडित वितरण सुनिश्चित करण्यासाठी त्वरित "मानवतेचा सेतू " उभारण्याची मागणी जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने केली आहे.

अफगाणिस्तान
afghanistan

बर्लिन - अफगाणिस्तानच्या लोकांना मदत करण्यास वचनबद्ध असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या दोन्ही संस्थांनी एका निवेदनात म्हटले आहे.कोणत्याही व्यावसायिक उड्डाणाला काबूलमध्ये उतरण्याची परवानगी दिली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

अफगाणिस्तानातील लोकांना गरज असलेल्या गोष्टीचा पुरवठा करण्यासाठी कोणताही मार्ग मिळत नाहीये. इतर मानवतावादी संस्थांनाही अशाच समस्या भेडसावत आहेत, असे संयुक्त राष्ट्राने सांगितले.

अनेक नागरिकांना बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. परंतु बहुसंख्य लोकसंख्येला मानवतावादी मदतीची गरज आहे. ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असे संयुक्त राष्ट्राने म्हटलं. अफगाणिस्तानातील लोकांना औषधे आणि इतर मदतीचे अखंडित वितरण सुनिश्चित करण्यासाठी त्वरित "मानवतेचा सेतू " उभारण्याची मागणी जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने केली आहे.

अहवालांनुसार, सध्याच्या स्थितीत सुमारे 6 लाख लोकांना अफगाणिस्तानमध्ये आपली घरे सोडावी लागली आहेत. यापैकी 80 टक्के महिला आणि मुले आहेत. त्यांना निवारा गृह, अन्न, स्वच्छता, औषधांची नितांत गरज आहे.

अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता -

अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीच्या नव्या अध्यायाला सुरुवात होत आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी बोलावल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. तालिबानी दहशतवाद्यांच्या भीतीनं संपूर्ण देशात दहशतीचं वातावरण आहे. मिळेल त्या मार्गाने नागरिक देश सोडत आहेत. नागरिकांनी काबूल विमानतळावर धाव घेतली असून विमानतळावर मोठी गर्दी झाली आहे. हृदय पिळवटून टाकणारी परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे.

हेही वाचा - तालिबानी दहशतवाद्यांनी केले १५० भारतीयांचे अपहण, वाचा नेमकं काय घडलं

हेही वाचा - तालिबानचा पहिला फतवा, हेरातमध्ये मुला-मुलींचे सहशिक्षण केले बंद!

हेही वाचा - अफगाणी महिलेने अमेरिकेच्या विमानात दिला गोंडस मुलीला जन्म!

Last Updated : Aug 23, 2021, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.