ETV Bharat / entertainment

रामायण फेम सीता अर्थात ​​दीपिका चिखलिया ग्लॅम ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओमुळे झाली ट्रोल

author img

By

Published : Oct 21, 2022, 2:54 PM IST

रामायण मालिकेच्या रिलीजला तीन दशकांहून अधिक काळ लोटला आहे पण पण प्रेक्षक दीपिकाला ग्लॅमरस अवतारात स्वीकारण्यास तयार नाहीत. अभिनेत्रीला तिच्या एका ग्लॅमरस ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओसाठी वाईटपणे ट्रोल केले जात आहे.

दीपिका चिखलिया
दीपिका चिखलिया

नवी दिल्ली - अभिनेत्री दीपिका चिखलियाला ( Dipika Chikhlia ) बुधवारी तिच्या सोशल मीडियावर एक रील व्हिडिओ शेअर केल्याबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा सामना करावा लागला आहे. दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिका रामायणमध्ये दीपिकाने सीतेची भूमिका साकारली होती. रामायण ( Ramayan ) रिलीज होऊन तीन दशकांहून अधिक काळ लोटला आहे पण प्रेक्षक दीपिकाला ग्लॅमरस अवतारात स्वीकारण्यास तयार नाहीत.

इंस्टाग्रामवर दीपिका चिखलियाने एक ट्रान्झिशन रील शेअर केले ज्याला तिने कॅप्शन दिले, "बदल आणि परिवर्तन.." व्हिडिओमध्ये, दिग्गज अभिनेत्रीला तिचा लूक नाईट सूटमधून एका सुंदर हिरव्या ड्रेसमध्ये बदलताना व्हिडिओत पाहता येऊ शकता. दीपिकाने व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी रेड हार्ट इमोटिकॉन्ससह कमेंट विभागात कौतुक केले , तर तिच्या काही अनुयायांना रील व्हिडिओ आवडला नाही म्हणून तिला केले.

"ये सब शोभा नहीं देता तुमको," अशी एका युजरने कमेंट केली. दुसर्‍या यूजरने लिहिले, "आपकी हर घर में पूजा होती है सीता माता, ऐसा अवतार क्यों." एका युजरने असेही म्हटले आहे की, "तुमच्या सीतेच्या सभ्य प्रतिमेनुसार हे तुम्हाला शोभत नाही." आणखी एक युजरने लिहिले की, "आपको सब सीता मैया के रूप एम देखते हैं कृपया कभी गलत पोस्ट मत डालना."

अभिनेता अरुण गोविल (राम) आणि सुनील लाहिरी (लक्ष्मण) यांच्यासोबत दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिका रामायणमध्ये दीपिकाने सीतेची भूमिका साकारली होती. शोचा प्रभाव इतका जबरदस्त होता की इतक्या वर्षांनंतरही चाहते अरुण आणि दीपिका यांनाच खरे भगवान राम आणि देवी सीता मानतात आणि त्यांचे आशीर्वादही घेतात.

याआधी देखील दीपिकाला तिच्या आधुनिक पोशाखाबद्दल सोशल मीडियावर खूप प्रतिक्रियांचा सामना करावा लागला होता. दरम्यान, दीपिका अलीकडेच दिग्दर्शक करण राजदानच्या हिंदुत्व: चॅप्टर वन या चित्रपटात दिसली होती जो 7 ऑक्टोबर 2022 रोजी प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा - स्मशानजोगी समाजाची कथा सांगणाऱ्या वास्तवदर्शी 'पल्याड' चा ट्रेलर अनावरीत!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.