ETV Bharat / entertainment

trailer of Jara Hatke Zara Bachke : लग्नापासून घटस्फोटापर्यंतची धमाल रोमँटिक कॉमेडी 'जरा हटके जरा बचके'चा ट्रेलर रिलीज

author img

By

Published : May 15, 2023, 2:14 PM IST

जरा हटके जरा बचके या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती निर्माता दिनेश विजान यांची असून सक्ष्मण उत्तेकर यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.

trailer of Jara Hatke Zara Bachke
'जरा हटके जरा बचके'चा ट्रेलर रिलीज

मुंबई - निर्माता दिनेश विजान यांचा लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित जरा हटके जरा बचके या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. विकी कौशल आणि सारा अली खानची प्रमुख भूमिका असलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रेक्षकांना मनोरंजनाची हमी देताना दिसत आहे.

ट्रेलरची सुरूवात विकी कौशल आणि सारा अली खान साकारत असलेल्या कपिल आणि सौम्या या इंदोरमध्ये राहणाऱ्या मध्यमवर्गीय जोडप्याच्या लग्नापासून होते. लग्नाची नवी नवलाई, फुलत जाणारे प्रेम आणि वाढत जाणारा रोमान्स सुरुवातीला दिसतो. ह्रषिकेश मुखर्जीच्या चित्रपटात दिसणारे मोठे कुटुंबीय आणि त्यांच्या आपुलकीचे प्रेम याचे दर्शन ट्रेलरमध्ये घडते. काळाबरोबरच यांच्या वैवाहिक जीवनातले सूर बेसूर होत जातात, मग सुरू होते नवरा बायकोतील टिपीकल तू तू मैं मैं. एकमेकांवरील आरोपांची जागा चक्क भांडणापर्यंत पोहोचले. आता हा खटला न्यायालयापर्यंत पोहोचतो. न्यायालयातील लढाई घटस्फोटाप्यंत जाऊन पोहोचते. घटस्फोटाच्या भाषेने दोघांचेही कुटुंब हादरते. इतकेच नाही पण आपण घटस्फोटापर्यंत पोहोचलोय याचीही दोघांना आश्चर्य वाटते. एकंदरीत धमाल रोमंटिक कॉमेडीची धमाल स्टोरी या चित्रपटातून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

लक्ष्मण उत्तेकरांचा हा चित्रपट खूप काळापासून प्रतीक्षेत होता. विकी कौशल आणि सारा अली खान या चित्रपटात हटके भूमिकेत दिसतात. गणेश आचर्य आणि विजय गांगुली यांनी काही धमाल गाणी कोरिओग्राफ केली आहेत. या चित्रपटातील गाणी अमिताभ भट्टचार्य यांनी लिहिली असून सचिन जिगर यां संगीतकार जोडीने ताल धरायला लावणारे संगीत दिले आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा मैत्रियी बाजपेयी, रमिझ इलम खान आणि लक्ष्मण उत्तेकर यांनी लिहिली आहे. निखळ मनोरंजनासाठी हा चित्रपट बनवलाय याची खात्री ट्रेलर पाहाताना मिळते. झकास गाणी, उत्तम कोरिओग्राफी आणि धमाल डायलॉग यांची रेलचेल चित्रपटात असणार आहे.

हेही वाचा - Siddharth Anand Deserves Praise : सध्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्विवाद नंबर वन दिग्दर्शक म्हणजे सिद्धार्थ आनंद!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.