ETV Bharat / entertainment

'वास? कसला वास?' मालदीव प्रकरणावरून भडकले सेलिब्रेटी, कंगना रणौतची जळजळीत प्रतिक्रिया

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 7:34 PM IST

Maldives Lakshadweep : पंतप्रधान नरेंद्र मोदीनं लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी मोदींची खिल्ली उडवत भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण कमेंट्स केल्या. यावरून आता सलमान खान, कंगना रणौत, अक्षय कुमार तसेच चित्रपटसृष्टीतील इतर स्टार्सनी मालदीवचा निषेध नोंदवलाय.

Maldives vs lakshadweep
मालदीव vs लक्षद्वीप

मुंबई : Maldives Lakshadweep : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यांनी तेथील सुंदर समुद्रकिनाऱ्यावरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पंतप्रधान मोदींच्या या भेटीनंतर लक्षद्वीप सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. मात्र मालदीवच्या काही मंत्र्यांना ही गोष्ट आवडली नाही. यानंतर मालदीव सरकारमधील अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवत भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण आणि वर्णभेदाच्या कमेंट्स केल्या. मात्र असं करणं आता त्यांना महागात पडलंय.

मालदीव आणि लक्षद्वीप प्रकरण : अक्षय कुमार, सलमान खानसह भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या विरोधात पुढे आले आणि त्यांनी चाहत्यांना देशातील सुंदर ठिकाणांना भेट देण्याचं आवाहन केलंय. या प्रकरणावरून अक्षय कुमारनं संताप व्यक्त करत, त्याच्या 'X' अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. "मालदीवच्या प्रमुख व्यक्तींनी भारतीयांविरोधात द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी कमेंट्स केल्या आहेत. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे, ज्या देशातून सर्वाधिक पर्यटक त्यांच्या देशात येतात, त्या देशासोबतच ते असं करत आहेत. आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगलं वागतो. मात्र आपण असा विनाकारण द्वेष का सहन करावा? मी मालदीवला अनेकदा भेट दिली आहे आणि त्यांचं नेहमीच कौतुक केलंय. तुम्ही भारतीय बेटांना भेट द्या आणि पर्यटनाला पाठिंबा द्या", असं अक्षय कुमार म्हणाला.

  • Came across comments from prominent public figures from Maldives passing hateful and racist comments on Indians. Surprised that they are doing this to a country that sends them the maximum number of tourists.
    We are good to our neighbors but
    why should we tolerate such… pic.twitter.com/DXRqkQFguN

    — Akshay Kumar (@akshaykumar) January 7, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या प्रतिक्रिया : अभिनेता जॉन अब्राहमनं 'X' वर लिहिलं, 'अतिथी देवो भव' या भारतीय आदरातिथ्याच्या कल्पनेसह लक्षद्वीप हे पाहण्यासारखे ठिकाण आहे. सलमान खाननं मालदीवला टोमणा मारताना भारतातील पर्यटनाला पाठिंबा दिला. "आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्षद्वीपच्या सुंदर, स्वच्छ आणि आश्चर्यकारक समुद्रकिनाऱ्यांवर पाहून खूप आनंद झाला. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे आपल्या भारतात आहे", असं सलमान म्हणाला.

  • It is so cool to see our Hon PM Narendrabhai Modi at the beautiful clean n stunning beaches of Lakshadweep, and the best part is that yeh hamare India mein hain.

    — Salman Khan (@BeingSalmanKhan) January 7, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कंगना रणौतची जळजळीत प्रतिक्रिया : कंगना रणौतनं म्हटलं, वास?? कायमचा वास?? काय!!! लक्षद्वीपमध्ये 98 टक्के मुस्लीम लोकसंख्या आहे. मालदीवमधील प्रमुख सार्वजनिक व्यक्ती त्यांना दुर्गंधीयुक्त आणि नीच संबोधत आहेl. ते वर्णद्वेषी आणि अनभिज्ञ आहेत. लक्षद्वीपची एकूण लोकसंख्या 60 हजार आहे. याचा अर्थ ते जवळजवळ अस्पर्शित आहे. इतके क्रूर आणि असभ्य वंशवादी असल्याबद्दल तुमची लाज वाटते.

  • Smell?? Permanent smell?? What!!! Suffering from massive Muslim phobia, even though belonging to the same community. Lakshadweep consists of 98 percent of Muslim population, this prominent public figure from Maldives calling them smelly and lowly is rather racist and uninformed.… pic.twitter.com/hLbQvD5RYD

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) January 7, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. 'मेरी ख्रिसमस'ची कास्ट झाल्यानंतर कतरिना कैफनं केलं होतं विजय सेतुपतीला गुगल सर्च
  2. आयरा खाननं भाऊ जुनैद खानसोबत शेअर केला फोटो
  3. टायगर 3 'या'ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला रिलीज
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.