ETV Bharat / entertainment

AA22 Release Dat : अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर धुमाकुळ घालणार

author img

By

Published : Jul 3, 2023, 12:56 PM IST

अल्लू अर्जुन आणि दक्षिणेतील चित्रपट दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांची जोडी पुन्हा एकदा धमाका करायला एकत्र येत आहे. तसेच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केला आहे. पहा चित्रपटाचा व्हिडिओ...

ALLU ARJUN  MOVIE
अल्लू अर्जुनचा चित्रपट

मुंबई : सुप्परस्टार अल्लू अर्जुन आणि दक्षिणेतील चित्रपट दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांची जोडी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर धमाल करणार आहे. ही जोडी लवकरच त्यांच्या चौथ्या चित्रपटाची घोषणा करणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट शेअर केले आहे. या चित्रपटाचे नाव सध्याला AA22 असून लवकरच या चित्रपटाची घोषणा होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि सांगितले आहे की, हा चित्रपट सिनेमॅटिक तमाशा असेल. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांचे अधिक मनोरंजन करेल. यापूर्वी या जोडीने 'आला वैकुंठपुरमुलो' या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. दरम्यान, जुलै आणि सन ऑफ सत्यमूर्ती हे इतर चित्रपटही चाहत्यांना आवडले आहे.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार चित्रपट AA22 : निर्मात्यांनी चित्रपटाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केला आहे आणि लवकरच चित्रपटाबाबत मोठी घोषणा करण्याचे आश्वासन दिले आहे. या चित्रपटाबाबत फारशी माहिती समोर आली नसली तरी हा चित्रपट खूप जास्त जबरदस्त असणार हे दिसत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात अ‍ॅक्शन ड्रामा ​रोमान्स असणार आहे. अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रमच्या जोडीने 'आला वैकुंठपुरमुलो' या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातले होते.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

AA22 बद्दल : अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा 2 रिलीज झाल्यानंतर AA22ची डिसेंबर 2023 मध्ये शुटिंग सुरू होणार आहे . दरम्यान, 2024मध्ये हा चित्रपट चित्रपट प्रदर्शित होणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हरिका आणि हसीन क्रिएशन आणि गीता आर्ट्सच्या बॅनरखाली बनणाऱ्या या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. याआधी अल्लू अर्जुन त्याच्या ‘पुष्पा-२’ या चित्रपटामुळे फार जास्त चर्चेत आहे. असे म्हटले जात आहे की अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा 2' 2024 च्या उन्हाळी हंगामात प्रदर्शित होऊ शकतो. याशिवाय अल्लू अर्जुनने अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंग फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्यासोबत एक चित्रपटही साइन केला आहे.

हेही वाचा :

  1. Show Me The Secret Ranveer Singh : रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र काम करणार
  2. Adipurus Collection Day 17 : 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर होऊ शकतो क्लीन बोल्ड....कारण काय?
  3. Ranveer Singh hilarious video : पाहा रणवीर सिंगचे 'तुम क्या मिले' गाण्यावर धमाल रील, आलियासह चाहतेही फिदा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.