ETV Bharat / crime

Surat Crime : सहा वर्षापूर्वीच्या बालक चोरी प्रकरणी आरोपीला बेड्या, चिमुकला अपहरणकर्त्यांनाच मानतो आई वडील

author img

By

Published : Jan 26, 2023, 5:21 PM IST

सहा वर्षापूर्वी बाळ होत नसल्याने 108 रुग्णवाहिकेवर डॉक्टर असलेल्या आरोपीने चिमुकल्याची चोरी केली. मात्र पोलिसांनी या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अपहरण झालेला चिमुकला आता सहा वर्षाचा झाला असून तो अपहरणकर्त्यांनाच आपले आई वडील मानत आहे.

Police Arrested Couple Who Kidnapped Infant
आरोपीसह पोलीस पथक

सूरत - सहा वर्षाच्या अगोदर चिमुकल्याचे अपहरण करत चोरी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली आहे. मात्र या प्रकरणात चोरी झालेल्या बालकाने त्याच्या खऱ्या आई वडिलांकडे जाण्यास नकार दिल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सूरतजवळील कामरेज तालुक्यात उघडकीस आली आहे. कमलेश चंदूभाई ओड असे त्या चिमुकल्याची चोरी करणाऱ्या आरोपीच तर नैना असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. या दोघांनी मुलबाळ होत नसल्याने त्यांनी चिमुकल्याची शिशू केंद्रातून चोरी केली होती.

शिशू केंद्रातून झाली चोरी : सूफिया मोहम्मद अली अंसारी यांच्या चिमुकल्याचे शिशू केंद्रातून चोरी झाली होते. त्यांनी संतान सुखापासून वंचित असलेल्या दाम्पत्याने या चिमुकल्याची चोरी केली होती. आरोपी कमलेशच्या पत्नीचा तीन वेळा गर्भपात झाला होता. त्यामुळे कमलेश निराश होता. तो रुग्णवाहिकेवर ईएमटीच्या पदावर कार्यरत होता. बाळ हवे असल्याने त्याने शिशू केंद्रातून तपासण्याच्या बहाण्याने चिमुकल्याची चोरी केली होती.

टीका देण्याचा बहाणा: आरोपी कमलेश आणि नैनाने 5 जानेवारी 2017 ला शिशू केंद्राच्या वार्डमध्ये शिरत बाळाला टीका देण्याचा बहाणा केला. त्यानंतर स्वाथ्य केंद्राच्या वार्डमधूनच त्यांनी चिमुकल्याचे अपहरण केले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या बाळाच्या पालकांनी 5 जानेवारी 2017 ला कामराज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी देवेंद्रसिंह किशोरदान व नामदेव कालाभाई हे करत होते. यावेळी त्यांना कठोल गावातून 2017 ला चोरलेल्या चिमुकल्याचा सुगावा लागला. एका रुग्णवाहिकेवर कार्यरत आरोपीने त्याची चोरी केल्याची माहिती खबऱ्याने त्यांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बी भटोल, उपनिरीक्षक वी आर थुम्मर यांचे पथक करजनला पोहोचली.

आवळल्या डॉक्टरच्या मुसक्या : मियागाम करजन येथील 108 रुग्णावाहिकेवर डॉक्टर म्हणून कार्यरत असलेल्या कमलेशला पोलिसांनी ताब्यात घेत त्याची विचारपूस केली. यावेळी त्याने त्याची पत्नी नैना तीन वेळेस गर्बवती राहिली. मात्र त्यांना बाळ झाले नसल्याची माहिती त्याने दिली. त्यामुळे त्यांनी बाळाची चोरी करण्याची योजना बनवली.

असे चोरले बालक : आंबोली येथील अंसारी परिवारात 5 जानेवारीला बालकाचा जन्म झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी या चिमुकल्याचे अपहरण केले. त्याचे नावही त्यांनी स्मिथ ठेवले. तो सद्या सिनियर केजीमध्ये शिकत आहे. मात्र चिमुकल्याचे अपहरण करुन त्याची चोरी केल्यामुळे पोलिसांनी कमलेश त्याची पत्नी नैना यांच्यासह जज्ञेश खुमान राठवासह तिघांना कारागृहात पाठवले आहे. कमलेशने चिुकल्याचे अपहरण केल्यानंतर त्याला अगोदर अहमदाबाद आणि त्यानंतर मियागावला नेले होते.

तो त्यांनाच मानतो आई वडील : आरोपी कमलेशने चिमुकल्या स्मिथचे जन्मानंतरच अपहरण करुन त्याची तोरी केली होती. त्यामुळे त्याला त्याचे खरे आई वडील माहितीच नाहीत. स्मिथ चोरट्य़ा कमलेश आणि नैनालाच आपले आई वडील मानतो. त्यामुळे त्याने त्याच्या आई वडिलांकडे जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मोठा पेच निर्णाण झाला आहे.

हेही वाचा - Serial Killer Arrested: चार महिलांची संशयास्पद हत्या करत दहशत पसरवलेल्या सीरियल किलरला बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.