ETV Bharat / crime

Mumbai Drug Seizure १ हजार कोटींहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्ज मुंबई पोलिसांकडून जप्त

author img

By

Published : Aug 16, 2022, 5:02 PM IST

Updated : Aug 16, 2022, 8:21 PM IST

मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या Mumbai Anti Narcotics Cell वरळी युनिटने Anti Narcotics cell worli unit गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात एका ड्रग्जच्या कारखान्याचा भंडाफोड केला आहे. मुंबई पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकून सुमारे 513 किलो एमडी ड्रग्ज जप्त Mumbai police seized MD drug केले आहेत. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1026 कोटी रुपये आहे.

Mumbai Anti Narcotics Cell
ड्रग्जच्या कारखान्याचा भंडाफोड

मुंबई मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलच्या Mumbai Anti Narcotics Cell वरळी युनिटने Anti Narcotics cell worli unit गुजरातच्या भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागात एका ड्रग्जच्या कारखान्याचा भंडाफोड केला आहे. मुंबई पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकून सुमारे 513 किलो एमडी ड्रग्ज जप्त Mumbai police seized MD drug केले आहेत. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1026 कोटी रुपये आहे.

दत्ता नलवाडे, डीसीपी एन्टी नारकोटिक्स सेल

सात आरोपींना ठोकल्या बेड्या एमडी हा अंमली पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रियेमधील ८१२ किलोपेक्षा जास्त वजनाची पांढऱ्या रंगाची पावडर आणि ३९७ किलोपेक्षा अधिक वजनाचे तपकीरी रंगाचे खडे गुजरात राज्यातून जप्त केले आहे. मुंबई शहर आणि परिसरात मोठया प्रमाणात अंमली पदार्थाची पुरवठा करणारी आणि अंमली पदार्थाची निर्मिती अवैधपणे सुरू होती. मुंबई पोलिसांनी त्याचा व्यापार करणारी आंतरराज्यीय मोठी टोळी उध्वस्त करून ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वरळी विभागाने गुजरात राज्यातील पानोली, अंकलेश्वर येथे छापा टाकून कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि अटक करण्यात आहे. शमशुल्ला ओबेदुल्हा खान (३८), आयुब इझार अहमद शेख (३३), रेश्मा संजयकुमार चंदन (४९), रियाझ अब्दुल सत्तार मेमन (४३), प्रेमप्रकाश पारसनाथ गाणे (५२) , किरण पवार आणि गिरीराज दीक्षित अशी आरोपींची नावे आहेत.

Mumbai Anti Narcotics Cell
ड्रग्जच्या कारखान्याचा भंडाफोड

असा लागला सुगावा २९ मार्चला अमली पदार्थ विरोधी विशेष मोहीमेंतर्गत अमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटच्या पथकाने अमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे, पुरवठा साठा करणारे इसमांचा गस्तीदरम्यान शोध घेत असताना शिवाजीनगर, गोवंडीपरिसरातून एका आरोपीकडून २५० ग्रॅम आणि दुसऱ्या आरोपीकडून २ किलो ७६० ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आला. त्यानंतर या गुन्ह्याची चौकशी करताना आणखी एका आरोपीची माहिती आणि त्यास अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून एकूण ७०१ किलोपेक्षा अधिक वजनाचा एमडी ड्रग्ज अंदाजे किंमत १ हजार ४०३ कोटीचा जप्त करण्यात आला आहे.

ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले या गुन्हयाच्या पुढील तपासामध्ये आरोपीने गुजरात राज्यातील भरूच जिल्हयातील अंकलेश्वर तालुक्यातील एका कंपनीत एमडी ड्रग्ज बनविला असल्याची माहिती दिली. त्यानंतर १३ ऑगस्टला जी. आय.बी.सी., पानोली, अंकलेश्वर, राज्य गुजरात येथे रासायनिक कारखान्यात बनविलेला एकूण ५१३ किलोपेक्षा अधिक वजनाचा एमडी ड्रग्ज अंदाजे १ हजार २६ कोटी तसेच एमडी ड्रग्ज तयार करण्याच्या प्रक्रियेमधील ८१२ किलोपेक्षा अधिक वजनाची सफेद रंगाची पावडर व ३९७ किलोपेक्षा अधिक वजनावे तपकीरी रंगाचे खडे रासायनिक कारखान्यातून जप्त करून आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. अशा प्रकारे अमली पदार्थाची निर्मिती व व्यापार करणारे आंतरराज्यीय मोठे रॅकेट अमली पदार्थ विरोधी कक्ष, वरळी युनिटने उध्वस्त केले आहे.

हेही वाचा Satara Accident डंपर दुचाकीच्या भीषण अपघातात २२ वर्षीय तरूणी जागीच ठार

Last Updated : Aug 16, 2022, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.