ETV Bharat / city

Ganesha idols submitted by Dilip Vaiti ठाण्यातील हजारो गणेश मुर्ती संकलित करणाऱ्या अवलियाची अनोखी कहानी, पाहा सविस्तर

author img

By

Published : Aug 28, 2022, 8:21 AM IST

Ganesha idols submitted by Dilip Vaiti ठाण्यातील एका भक्ताने शेकडो गणेशमूर्तीचे संकलन Collection of hundreds Ganesha idols करून अनोखा छंद जोपासला आहे. तर या गणेश मूर्ती 9 मिलिमिटर पासून ते 5 फुटापर्यंत असून या सर्व मूर्ती या भटकंती करताना मिळालेल्या आहेत. दिलीप वैती Dilip Vaiti असे या कलाकाराचे नाव असून यासाठी त्याचे घर हे बाप्पामय बनले आहे. देश विदेशातील तब्बल बाराशे गणेशमूर्ती आणि 350 गणेशप्रतिमा घरात विराजमान Ganesha statue sitting in house झाल्या आहेत.

Ganesha idols submitted by Dilip Vaiti
Ganesha idols submitted by Dilip Vaiti

ठाणे ठाण्यातील एका भक्ताने शेकडो गणेशमूर्तीचे संकलन Collection of hundreds Ganesha idols करून अनोखा छंद जोपासला आहे. तर या गणेश मूर्ती 9 मिलिमिटर पासून ते 5 फुटापर्यंत असून या सर्व मूर्ती या भटकंती करताना मिळालेल्या आहेत. दिलीप वैती Dilip Vaiti असे या कलाकाराचे नाव असून यासाठी त्याचे घर हे बाप्पामय बनले आहे. देश विदेशातील तब्बल बाराशे गणेशमूर्ती आणि 350 गणेश प्रतिमा घरात विराजमान Ganesha statue sitting in house झाल्या आहेत. गेल्या 28 वर्षे त्यांचा हा प्रवास सुरुच आहे. गणेशा हा ६४ कलांचा अधिपती त्या अनुषंगाने गेल्या 4 ते 5 वर्षे माॅर्निंग मोरया Morning Moray हा कलेच्या माध्यमातून उपक्रम सुरू असून या रेखाटण्यात आलेल्या गणेशावर कवींनी उत्स्फूर्तपणे कविता देखील रचल्या आहेत.

बाराशे गणेशमूर्ती विराजमान ठाण्यातील राबोडी या मुस्लीमबहुल भागात राहणारे दिलीप वैती कुठलेही व्रतवैकल्य अथवा उपासतपास करत नाहीत. तरीही त्यांच्यात गणेशभक्ती ओतप्रोत भरलेली आहे. यंदा आमचे १२२ वे वर्षं आहे. या निमित्ताने शब्द चित्र रूपाच्या माध्यमातून जो गणपती साकारला जाणार आहे. त्याची प्रतिमा विकून येणारे उत्पन्न एखाद्या सामाजिक संस्थेला देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गणपती म्हणजे केवळ सजावट हा उद्देश न ठेवता समाजप्रबोधन उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती ठाण्यात राबोडी येथे मुस्लिम बहुल भागात राहणारे कलेशी निगडित असणारे दिलीप वैती यांनी दिली. Ganesha statue sitting in house यावेळी बोलताना त्यांनी माॅर्निंग मोरया ही संकल्पना माझी नसून माझ्यावर गणेशाची कृपा असल्याने आज 4 वर्षात विविध रूपांत १२०० हून अधिक चित्र साकारली गेली, मग ती पाण्याच्या थेंबात दिसणारे गणेश असो किंवा नागाच्या वेटोळ्यात, पाठीच्या मणक्यात, जास्वंदीच्या एका पाकळीवर चित्ररूपात अवतरली. यासाठी त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरील 2 खोल्यामध्ये व्यवस्था केली आहे. येथील वैशिष्ट्यपूर्ण रचनेत कृषीगणेशा ते विश्वविनायकाच्या तब्बल बाराशे गणेशमूर्ती विराजमान आहेत.

Ganesha idols submitted by Dilip Vaiti

अशा प्रकारच्या आहेत गणेशमूर्ती यात माती, शाडू, लाकूड, सोने आणि चांदी, पंचधातू, तांबे, पितळ, शंख शिंपले, नारळाची करवंटी, फायबर, सिरॅमिकटेराकोटा, चायना,मार्बल, मशरूम, दगड, काच अशा विविध प्रकारातील गणेश आहेत. आरामात पहुडलेले गणराय, क्रिकेट खेळणारे विविध पोझमधील बाप्पा, सभागायन करताना, खुर्चीवर पुस्तक वाचताना, बुद्धिबळ खेळताना, व्यायाम करताना, मूषकराजांच्या शाळेत शिकवताना, Ganesha statue sitting in house आदिवासी वेशात, बालरूपात, पाळण्यात सृष्टी गणेश ते विश्वविनायक Ganeshotsav 2022 अशा अनेक रूपात लोभस गणेशाच्या मूर्ती मन मोहून घेतात. त्यांच्या या संग्रहालयात जपान, इंडोनेशियासह कंबोडिया आदी देशातील आणि भारत भरातील मूर्तींचा समावेश आहे. तर, वैती यांनी गणेशमूर्तींच्या संकलन करत असताना कॅनव्हॉसवर चितारलेल्या पुरुष गणपतीचे चित्र विलक्षण असून आजवर त्यांनी साकारलेल्या गणेशाच्या तब्बल बाराशे प्रतिमाचा खजिना त्यांनी जीवापाड जपला आहे.

हेही वाचा Anand Dighe आनंद दिघेंसाठी मध्यरात्री दुकान उघडून आणली होती 121 मण्यांची रुद्राक्षाची माळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.