ETV Bharat / city

अखेर सोलापुरातील शाळांची घंटा वाजली, विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

author img

By

Published : Jul 12, 2021, 5:26 PM IST

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची अखेर घंटा वाजली असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सोलापूर जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 335 गावातील शाळा सुरू झाल्या आहेत.

कोरोनाचे
कोरोनाचे

सोलापूर - कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची अखेर घंटा वाजली असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत सोलापूर जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 335 गावातील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिल्या होत्या. त्याअनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांची घंटा वाजली आहे. दीड वर्षापासून घरी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू झाल्याचा आनंदच वेगळा होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत केले.

कोरोनाचे नियम पाळत सोलापुरातील शाळांची अखेर घंटा वाजली

संपूर्ण शाळेचे सॅनेटाईजेशन -
सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाळा शासनाने कोविडच्या संशयित रुग्णाच्या विलगिकरणासाठी वापरल्या होत्या. त्यामुळे त्या सर्व शाळा सॅनिटाईज करण्यात आल्या. शाळा गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने वर्गांची साफसफाई करण्यात आली. शाळा सुरू झाल्याने ऑनलाइन सुरू असलेल्या वर्गाला काही प्रमाणात थांबा मिळाला आहे.

गुलाब पुष्प देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत
गुलाब पुष्प देऊन केले विद्यार्थ्यांचे स्वागत

ज्या गावात कोरोना रुग्ण नाही त्या गावात शालेय वर्ग सुरू -
ऑनलाइन शिक्षणात सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाइल होते असे नव्हते. ज्यांच्याकडे होते त्यांना नेटवर्कची अडचण येत होती, तर काही विद्यार्थ्यांना शिकवलेले समजत नव्हते. बरेच विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून पळ काढत होते. सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू झाल्या नाहीत. ज्या गावात गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण सापडले नाहीत अशा गावातील शाळा सुरू झाल्या आहेत.

मोहोळ तालुक्यातील 26 शाळा सुरू -
जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह पहायला मिळाला. मोहोळ तालुक्यातील 26 शाळा सुरू झाल्या असून येणाऱ्या काही दिवसात तालुक्यातील सर्व शाळा सुरू होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथील राजन पाटील विद्यालयामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी उत्साहात दाखल झाले. शिक्षकांनी मुलांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना देऊन शाळा प्रशासनाने मुलांचे हात सॅनिटाईज केले. यावेळी मुलांचे तापमान तपासून त्याची नोंद करण्यात आली. मुलांना मास्क, सॅनिटाईजचे वाटप करण्यात आले.

सामाजिक अंतर ठेवून वर्ग सुरू -
शाळेतील शिक्षकांनी मुलांना गुलाब पुष्प देऊन देऊन स्वागत केले. मुलांनी व शिक्षकांनी मास्कचा वापर करीत शिक्षणाला सुरुवात केली. यावेळी वर्गात योग्य ते सामाजिक अंतर ठेवत मुले प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे गिरवू लागले आहेत. यावेळी शाळेत मुलांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक भालचंद्र जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नागेश साठे, केंद्र प्रमुख अप्पा देशमुख, संस्थेचे सचिव विजयकुमार चांदणे, शिक्षक हणमंत कोकरे, सावकार कारंडे, ठाकरे, नागटीळक, डोंगरे, आवारे, भारत कादे, सुनील कादे, पटू हजारे आदींनी केले.

हेही वाचा - सहकार खाते शाह यांच्याकडे गेल्याने घाबरण्याचे कारण नाही - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.