ETV Bharat / city

Gas Cylinder Price Hike Congress Agitation : ईडी भाजपाच्या सांगण्यावरुन काम करते हे अनेकवेळा सिद्ध झालयं - प्रणिती शिंदे

author img

By

Published : Apr 6, 2022, 3:22 PM IST

Updated : Apr 6, 2022, 3:34 PM IST

सोलापूर जिल्हाधिकारी ( Collector Office Solapur ) कार्यालयासमोर काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले, आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. दुचाकी रस्त्यावर टाकून घरगुती गॅस सिलेंडरला ( Gas cylinder price hike ) हार घालून महागाई विरोधात निदर्शने करण्यात आली. ईडी जीसकी मम्मी है, वह सरकार निकमी है, अशा नवीन घोषणा यावेळी आंदोलक देत होते. ईडीच्या कारवाईवरुन ईडी ( ED ) यांच्यासाठी काम करते हे अनेक वेळा भाजपा ( BJP ) नेत्यांच्या वक्तव्यावरुन दिसून येते आहे, अशी टीकाही आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

काँग्रेस आंदोलन सोलापूर
काँग्रेस आंदोलन सोलापूर

सोलापूर - देशातील डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आमदार प्रणिती शिंदे ( MLA Praniti Shinde ) यांच्या नेतृत्वाखाली आज (बुधवारी) आंदोलन करण्यात ( Congress agitation against central government ) आले. यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोलापूर जिल्हाधिकारी ( Collector Office Solapur ) कार्यालयासमोर काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले, आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. दुचाकी रस्त्यावर टाकून घरगुती गॅस सिलेंडरला ( Gas cylinder price hike ) हार घालून महागाई विरोधात निदर्शने करण्यात आली. ईडी जीसकी मम्मी है, वह सरकार निकमी है, अशा नवीन घोषणा यावेळी आंदोलक देत होते. ईडीच्या कारवाईवरुन ईडी ( ED ) यांच्यासाठी काम करते हे अनेक वेळा भाजपा ( BJP ) नेत्यांच्या वक्तव्यावरुन दिसून येते आहे, अशी टीकाही आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया देताना आमदार प्रणिती शिंदे



'मनमोहन सिंग पंतप्रधान असताना 400 रुपये गॅस सिलेंडर होता' : देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग हे पदावर असताना घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 400 रुपये झाले होते. त्यावेळी भाजपाने त्यांना बांगड्या पाठवल्या होत्या. आता गॅस सिलेंडरची किंमत 1000 रुपयांपर्यंत गेली आहे. आता त्यांना काय पाठवायचे? असा सवाल काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. गेल्या आठवडा भरापासून इंधन दरवाढ होत चालली आहे. पेट्रोल 115 रुपयांच्या पुढे गेले आहे आणि डिझेल शंभरच्या पुढे गेले आहे. अशा महागाईच्या जीवनात सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आता तरी जनतेने डोळे उघडावे, असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले आहे.


'ईडी भाजपासाठी काम करते' : ईडी ही ऑटोनोमस म्हणजेच स्वायत्त संस्था आहे. या स्वायत्त संस्थेचा अनेकवेळा भाजपा गैरवापर करत आहे. कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी स्वतः म्हटले होते की, तुम्ही पेटीएमवरून देखील पैसे पाठविला तर ईडी लावू, यावरून हे सिद्ध झाले आहे, की ईडीचा गैरवापर भाजपा करत आहे, अशी टीकाही प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा - CBI Arrests Anil Deshmukh : सीबाआयने अनिल देशमुखांना ताब्यात घेतले; तर याचिकेवरील सुनावणीस न्यायाधीशांचा नकार

Last Updated : Apr 6, 2022, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.