ETV Bharat / city

Raghunath Kuchik Case : चित्रा वाघ यांच्या माणसांनीच माझं अपहरण केलं : कुचिक बलात्कार प्रकरणातील तरुणीचा गंभीर आरोप

author img

By

Published : Apr 12, 2022, 5:21 PM IST

शिवसेना नेते रघुनाथ कुचिक ( Shivsena Leader Raghunath Kuchik ) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने ( Rape Allegation On Raghunath Kuchik ) आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरच आरोप केला ( Rape Victims Allegation On Chitra Wagh ) आहे. चित्रा वाघ यांच्या माणसांनीच माझं अपहरण केलं, असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

चित्रा वाघ यांच्या माणसांनीच माझं अपहरण केलं : कुचिक बलात्कार प्रकरणातील तरुणीचा गंभीर आरोप
चित्रा वाघ यांच्या माणसांनीच माझं अपहरण केलं : कुचिक बलात्कार प्रकरणातील तरुणीचा गंभीर आरोप

पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक ( Shivsena Leader Raghunath Kuchik ) यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्याऱ्या ( Rape Allegation On Raghunath Kuchik ) पीडित तरुणीने आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप ( Rape Victims Allegation On Chitra Wagh ) केलेत. चित्रा वाघ यांनी आपल्याला सुसाईड नोट ( Suicide Note Raghunath Kuchik Case ) लिहायला लावल्याचा धक्कादायक आरोप या पीडित मुलीने केला आहे. तसेच कुचिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर चित्रा वाघ यांच्याच माणसांनीच आपलं अपहरण करुन गोव्याला नेल्याचाही आरोपही या तरुणीने केलं आहे.


चित्रा वाघ यांच्या दबावामुळे मला तक्रार दाखल करावी लागली : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे एका 22 वर्षीय तरुणीने बलात्काराची तक्रार केली होती. यानंतर राजकारण चांगलच तापलं होत. माझ्यात आणि कुचिक यांच्यात जे झालं झालं आहे ते खरं आहे पण मला तक्रार द्यायची नव्हती. जेव्हा माझ्या एका अंकलच्या सहाय्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी संबंध आला. तेव्हा चित्रा वाघ यांच्या दबावामुळे मला तक्रार दाखल करावी लागली असल्याचा धक्कादायक खुलासा यावेळी पीडित तरुणीने केला आहे.

चित्रा वाघ यांच्या माणसांनीच माझं अपहरण केलं : कुचिक बलात्कार प्रकरणातील तरुणीचा गंभीर आरोप.. चित्रा वाघ म्हणाल्या, चौकशीसाठी तयार


माझ्या नावाने सुसाईड पत्र लिहिण्यात आलं : या प्रकरणात काही अश्या गोष्टी आहेत, ज्या मी कधीही बोलले नाही त्या चित्रा वाघ यांनी संगितले आहे. जे मेसेज मी केले नाही ते मेसेजच्या माध्यमातून सांगितले गेले आहेत. तसेच काल मला त्यांच्या एका माणसाकडून सांगण्यात आलं की, हे पत्र पोलिसांकडे दे. ज्यात मला देखील माहीत नव्हतं की, माझ्या नावाने सुसाईड पत्र लिहिण्यात आलं, असादेखील धक्कादायक खुलासा पीडित तरुणीने केला आहे.


माझ्या विरोधात सगळे एकत्र आले आहे याचा आनंद : या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, पिडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले. खरं तर वाईट वाटल पण हरकत नाही, असेही अनुभव येतात. फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पिडीतेसोबत उभे राहीले, तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं. आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र आले आहेत, याचा आनंद वाटला. मी सगळ्या चौकशीसाठी तयार आहे, असं देखील यावेळी चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.