ETV Bharat / city

अजित पवार हे आमच्या सरकारची 'स्टेपनी' - संजय राऊत

author img

By

Published : Jan 15, 2020, 5:37 PM IST

आमची गाडी घसरणार नाही याची आम्हाला खात्री होती. सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत. मात्र, स्टेपनीसुद्धा महत्त्वाची असते, असे संजय राऊत म्हणाले.

sanjay raut on ajit pawar
अजित पवार हे आमच्या सरकारची 'स्टेपनी'

पुणे - अजित पवार हे स्टेपनी आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पुण्यातील एका मुलाखती दरम्यान बोलताना राऊत यांनी 'भाजप आणि अजित पवार' यांच्या सरकार स्थापनेच्या प्रयत्नावर आपल्या खास शैलीत भाष्य केले. अजित पवार भाजपसोबत गेले होते. पण ते पुन्हा परत आले. सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेच योग्य आहेत, तर अजित पवार स्टेपनी आहेत. मात्र, स्टेपनीसुद्धा महत्वाची असते, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पुणे येथे खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत...

हेही वाचा... शरद पवार काल, आज आणि उद्याही आमचे 'जाणता राजा'च.. मुंबईत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

लोकमत वृत्तपत्रातर्फे पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संजय राऊत यांच्या हस्ते यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यानंतर संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. मुलाखती दरम्यान संजय राऊतांनी विविध राजकीय मुद्द्यावर सडेतोड भाष्य केले.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?

'आमच्या गाडीचा नटबोल्ट ढिला करायचा प्रयत्न होईल हे माहित होते. पण आमची गाडी घसरणार नाही याची खात्री होती. आमची चाके शाबूद होती. मात्र, ते आमची स्टेपनी घेऊन गेले. स्टेपनी सुद्धा गाडीचा महत्त्वाचा भाग असतो. अजित पवार हे खूप महत्वाचे नेते आहेत. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अजित पवारांसह सगळे परत आले. स्टेपनीशिवाय सरकार चालू शकत नाही. मात्र, अजित पवार हे आता स्टेपनी नाहीत, तर महत्वाचे चाक झाले आहेत. आणि ते चाक आता गाडीला लागलेही आहे', असे संजय राऊत यांनी म्हटले.

हेही वाचा... 'शिवसेना सोयीनुसार भूमिका बदलत नाही; सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी याचे भान ठेवा'

सध्या राज्यात असलेले महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. हे सरकार पूर्ण पाच वर्ष काम करेल. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सरकारची निर्मिती झाली आहे. त्यामुळे या सरकारला धोका नाही. तसेच विरोधकांनीही मजबूत विरोधक म्हणून काम करावे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Intro:उदयनराजे हे गादीचे वारस आहेत त्यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे, रयतेचे काम करणारा राजा होता लूटमार करणाऱ्याना कोणी राजे म्हणत नाही, संजय राऊत


Body:mh_pun_01_sanjay_raut_tolebaji_avb_7201348

anchor
उदयनराजे यांनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे आम्ही त्यांना राजे मानतो ते गादीचे वारसदार आहेत असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून केले शिवसेना भवनावर कोणाचा फोटो कुठे लावायचा हे आम्हाला उदयनराजे यांनी सांगू नये असेदेखील संजय राऊत म्हणाले पुण्यामध्ये लोकमत वृत्तपत्रात तर्फे पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते संजय राऊत यांच्या हस्ते यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यानंतर संजय राऊत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली यावेळी संजय राऊत यांनी विविध राजकीय मुद्द्यावर सडेतोड भाष्य केले सध्या राज्यात असलेले सरकार चांगल्या पद्धतीने काम करत असून पूर्ण पाच वर्ष हे सरकार काम करेल शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या सरकारची निर्मिती झाली आहे त्यामुळे या सरकारला धोका नाही हे सरकार काम करेल विरोधकांनी मजबूत विरोधक म्हणून काम करावं असेदेखील ते म्हणाले सरकार बनवत असतानाच या एक महिन्याच्या काळात विविध घडामोडी घडल्या यावर भाष्य करताना अजित पवार जरी भाजप सोबत गेले होते तरी ते पुन्हा परत आले याबाबत बोलत असताना अजित पवार हे या सरकारची स्टेफनी असल्याचं वक्तव्यही संजय राऊत यांच्याकडून झाले मात्र त्यांनी तातडीने सारवासारव करत स्टेफनी देखील गाडीसाठी तितकीच मजबूत आणि महत्त्वाची असते ते यासारखा चा महत्त्वाचा भाग असल्याचं राऊत म्हणाले उदयनराजे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेवर बोलताना संजय राऊत यांनी उदयनराजे यांच्या विधानाचा देखील समाचार घेतला एकंदरीतच संजय राऊत यांनी या मुलाखतीत बिनधास्त वक्तव्य करत आपल्या रोखठोक शैलीचा प्रत्यय आणून दिला राज ठाकरे आणि भाजपच्या जवळकी संदर्भात बोलताना भाजपला राज ठाकरे यांना घेऊन राजकारण करायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे मात्र त्यांना उत्तर प्रदेश बिहार अशा राज्यांमध्ये याबाबत प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरे द्यावे लागतील त्यासाठी कोण पुढे येणार आहे असा टोला देखील त्यांनी मारला
byte संजय राऊत, खासदार शिवसेना


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.