ETV Bharat / city

Kirit Somaiya : 'झेड प्लस' सुरक्षा असणारी व्यक्ती बेपत्ता होऊ शकत नाही! राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्रीय यंत्रणांवर आक्षेप

author img

By

Published : Apr 12, 2022, 11:01 AM IST

न्यायालयाने पिता-पुत्राचा जामीन अर्ज फेटाळला. तेव्हापासून सोमय्या बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात वेगवेगळ्या चर्चा होत आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी सोमय्या आणि केंद्रीय यंत्रणांवर निशाणा साधला आहे.

Kirit Somaiya
Kirit Somaiya

पणजी (गोवा) - आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने पिता-पुत्राचा जामीन अर्ज फेटाळला. तेव्हापासून सोमय्या बेपत्ता असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात वेगवेगळ्या चर्चा होत आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी सोमय्या आणि केंद्रीय यंत्रणांवर निशाणा साधला आहे.

  • There is a talk in town that Kirit Somaiya is probably missing.
    But a man who has 'Z plus' #CISF security cannot be missing, because #MHA will surely have intel on his whereabouts.
    If #KiritSomaiya is hiding, it will be MHA's duty to inform investigating agencies when required.

    — Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) April 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

केंद्रीय यंत्रणांकडे माहिती असेल - किरीट सोमय्या बेपत्ता असल्याची शहरात चर्चा आहे. पण झेड प्लस सुरक्षा असलेला माणूस बेपत्ता होऊच शकत नाही. त्यांच्या ठावठिकाणाची माहिती केंद्रीय यंत्रणांना निश्चितपणे असेल. जर किरीट सोमय्या लपत असतील तर तपास यंत्रणांना आवश्यक असेल ती माहिती देणे त्यांचे कर्तव्य आहे, असे ट्विट क्लाईट क्रास्टो यांनी केले. त्यांनी हे ट्विट करून एकप्रकारे केंद्रीय गृहमंत्रालयावर आक्षेप घेतल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - Kirit Somaiya Bail Rejected : किरीट सोमैयांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता; अटकपूर्व जामीन फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.