ETV Bharat / city

येत्या काही दिवसात महाराष्ट्राचा दौरा करणार, भाजपाचे हिंदुत्व केवळ राजकारणासाठी - मुख्यमंत्री ठाकरे

author img

By

Published : Mar 20, 2022, 2:26 PM IST

शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानाची घोषणा ( CM Thackeray on Shiv Sampark Abhiyan ) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना संबोधित करताना लवकरच आपण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

cm Thackeray on Shiv Sampark Abhiyan
महाराष्ट्र दौरा उद्धव ठाकरे

मुंबई - शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानाची घोषणा ( CM Thackeray on Shiv Sampark Abhiyan ) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना संबोधित करताना लवकरच आपण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचा समाचार यावेळी मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला.

हेही वाचा - डीसीपी सौरभ त्रिपाठीचा इतर राज्यांत शोध सुरू, त्रिपाठी यांना हवालाद्वारे पैसे पुरवणाऱ्याला यू.पी मधून अटक

केवळ राजकारण करायचे असेल, तेव्हा भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा समोर काढते. सत्तेसाठी मेहबुबा मुफ्तीसोबत भारतीय जनता पक्ष गेला असल्याची आठवणही यावेळी मुख्यमंत्र्यांनी करून दिली. तसेच, सरकारचा दाऊद इब्राहिमशी संबंध जोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. भारतीय जनता पक्षाची कट-कारस्थाने ओळखायला शिका, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना केल्या.

22 ते 25 मार्च "शिव संपर्क अभियान" शिवसेनेकडून राबवला जाणार आहे. यावेळी पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये अभियानाचा पहिला टप्पा राबविण्यात येणार असून, या अभियानासोबत शिवसेनेच्या प्रत्येक खासदार, जिल्हा प्रमुखांनी गावागावात जाऊन पक्षाची बांधणी करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

दादर येथील शिवसेना भवनात खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई यांच्यासह काही कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. पुढील दोन वर्षांत लोकसभा निवडणुका होणार असून, या निवडणुकांसाठी पक्षाच्या तयारीसाठी लागण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्वच नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

एमआयएम सोबत कोणतीही युती नाही

एमआयएमकडून युतीची ऑफर महाविकास आघाडीला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत एमआयएमसोबत युती केली जाणार नाही. एमआयएम म्हणजे भारतीय जनता पक्षाची 'बी टीम' असल्याचा आरोप यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच, उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला असला तरी, गेल्या वेळ पेक्षा यावेळी भाजपच्या जागा नक्कीच घटल्या आहेत. याकडे पदाधिकारी आणि नेत्यांनी दुर्लक्ष करू नये. भारतीय जनता पक्षाच्या राजकीय कुरापती उधळून लावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या संवादातून केल्या.

हेही वाचा - शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेली तेव्हाच संपली -चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.