ETV Bharat / city

Statement on Ajay Chaudhary: सचिवालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, अजय चौधरी यांचं वक्तव्य

author img

By

Published : Jul 4, 2022, 10:28 AM IST

विधिमंडळ सचिवांच्या या निर्णयानंतर बोलताना उद्धव ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी यांनी सांगितले आहे की, विधिमंडळ सचिवालयाला गटनेते पद रद्द करण्याचा अधिकार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात याबाबत कायदेशीर लढाई लढणार अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी यावेळी दिली आहे.

Statement on Ajay Chaudhary
अजय चौधरी यांचं वक्तव्य

मुंबई - शिवसेना नक्की कोणाची, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची? की बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांची? यावरून मागील काही दिवसांपासून चर्चांना उधाण आल असतानाच, अखेर काल विधिमंडळ सचिवालयाने पत्र काढून एकनाथ शिंदे यांचे गटनेतेपद कायम ठेवत अजय चौधरी यांचे गटनेते पद रद्द केले आहे. त्याचबरोबर भरत गोगावले यांचे प्रतोद पद कायम ठेवत सुनील प्रभू यांचे प्रतोद पद रद्द करण्यात आले आहे. हा शिवसेनेसाठी विशेष करून, उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) कुटुंबीयांसाठी फार मोठा झटका असून आता ही लढाई न्यायालयात लढली जाणार आहे.

सचिवालयाला अधिकार नाही? - विधिमंडळ सचिवांच्या या निर्णयानंतर बोलताना उद्धव ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी यांनी सांगितले आहे की, विधिमंडळ सचिवालयाला गटनेते पद रद्द करण्याचा अधिकार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात याबाबत कायदेशीर लढाई लढणार अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी यावेळी दिली आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या १६ आमदारांचे भवितव्य धोक्यात? - काल झालेल्या विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिप जारी करत त्यांच्या गटाने भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. परंतु, उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे १६ आमदार यांनी त्यांचे उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान केले आहे. आता यावरून सुद्धा न्यायिक पेच निर्माण झालेला आहे. जर एकनाथ शिंदे हे गटनेते आहेत व प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती झाली आहे. तर या १६ आमदारांनी पक्षाध्यक्ष न मानल्याकारणाने त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते किंवा त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते का? हा सुद्धा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.

हेही वाचा - Shinde Fadnavis Gov floor test : शिंदे फडणवीस सरकारची आज बहुमत चाचणी , जाणून घ्या महत्त्वाचे १२ मुद्दे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.