ETV Bharat / city

Omicron Variant : ओमायक्रॉनबाबत दोन दिवसात राज्यात नियमावली जाहीर

author img

By

Published : Dec 3, 2021, 6:25 PM IST

ओमायक्रॉनचा (Omicron Variant) प्रादुर्भाव पाहता येत्या दोन दिवसात राज्यामध्ये नवीन नियमावली (New Guidelines Omicron variant) जाहीर होऊ शकते. अशी शक्यता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar) यांनी व्यक्त केली आहे.

Vijay vadettivar
मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई - ओमायक्रॉनचा (Omicron Variant) प्रादुर्भाव पाहता येत्या दोन दिवसात राज्यामध्ये नवीन नियमावली जाहीर होऊ शकते. अशी शक्यता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar) यांनी व्यक्त केली आहे. यासंबंधी मुख्यमंत्री संबंधित अधिकारी आणि विभागांशी चर्चा करत आहेत. त्यानंतर नियमावली जाहीर होण्याची शक्यता असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

जनतेने सतर्कता पाळावी
ओमायक्रॉनबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत. म्यूकर मायकोसीस प्रमाणेच ओमिक्रोनला घाबरून जाण्याचं कारण नाही. जनतेने घाबरून न जाणता याबाबत सतर्कता पाळत जागृत राहावे असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केल आहे. राज्यभरात 29 ओमायक्रॉनचे संशयित रुग्ण सापडले आहेत. मात्र याबाबतचा अहवाल अद्यापही आलेला नाही. तसेच महाराष्ट्राच्या वेशीवर 2 रुग्ण सापडल्यामुळे राज्यभरात भीतीचे वातावरण तयार झाला आहे.

हेही वाचा - Restrictions after omicron: केंद्र सरकार ठरवेल त्याप्रमाणे राज्यात निर्बंध लागू होतील - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.