ETV Bharat / city

New Cabinet Expansion : नव्या मंत्रिमंडळ विस्तारात गृह, महसूल व नगर विकास, अर्थ खात्यावरून खलबत्तं?

author img

By

Published : Jul 6, 2022, 6:18 PM IST

एका मागे मग एक घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात सत्तांतर झाले. परंतु आता सर्वांचे लक्ष राज्य सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे ( New Cabinet expansion ) लागले आहे. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ( Shinde-Fadnavis government ) मंत्रिमंडळ विस्तारावरून खलबत्त सुरू आहेत.

Home, revenue and urban development, finance in new cabinet expansion?
नव्या मंत्रिमंडळ विस्तारात गृह, महसूल व नगर विकास, अर्थ खात्यावरून खलबत्त?

मुंबई - राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकार ( Shinde-Fadnavis government ) मध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून खलबत्त सुरू आहेत. ज्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात सत्तांतर झाले आहे, ते पाहता सर्वात महत्त्वाचं म्हणजे १६४ आमदारांचा पाठिंबा असतानाही भाजपने उपमुख्यमंत्री ( Deputy Chief Minister ) पदावर समाधान मानले आहे. अशात या सत्तांतरामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) हे खाते वाटपात त्यांच्या वाट्याला किती मंत्री पद घेतात हे बघणं सुद्धा गरजेचं झालं आहे.

गृह, देवेंद्र तर, महसूल चंद्रकांत पाटील यांच्याकडे? एका मागे मग एक घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात सत्तांतर झाले. परंतु आता सर्वांचे लक्ष राज्य सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे ( New Cabinet expansion ) लागले आहे. या विस्तारामध्ये महत्त्वाचं खात म्हणजे गृह खात. मागील महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकारमध्ये हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. परंतु या दरम्यान या खात्यावरून जी काही बदनामी झाली ती पाहता हे खाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडेच राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपत आला असल्याकारणाने २०१४ -१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीत महसूल खाते त्यांच्याकडे होते. त्या अनुषंगाने आता चंद्रकांत पाटील यांची पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लावून त्यांच्याकडे महसूल खाते दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अर्थ खाते शिंदे गटाकडे? वास्तविक गृह व महसूल या दोन खात्यांपैकी एक खाते तरी शिंदे गटाला हवे आहे. तशी मागणी शिंदे गटाच्या आमदाराकडून केली जात आहे. मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये नगर विकास खाते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. आतापर्यंत इतिहास पाहिला तर नगर विकास खाते हे मुख्यमंत्रींनी आपल्याकडेच ठेवलेले आहे. परंतु मागच्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठेपणा दाखवत हे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले होते. त्या अनुषंगाने यंदा नगर विकास हे खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार आहे. तसेच अर्थ खातेही शिंदे गटाकडे दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर या खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शिंदे गटाचे बंडखोर आमदार व प्रवक्ते दीपक केसरकर यांची वर्णी लागू शकते. मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये दीपक केसरकर हे अर्थ विभागाचे राज्यमंत्री होते.

भाजपकडे जास्त मंत्री पद? सन २०१४ ते १९ या दरम्यानच्या भाजप -शिवसेना युतीच्या काळात गृह, महसूल, नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते भाजपकडे होती. मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृह खाते व अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे, महसूल खाते काँग्रेसकडे व नगर विकास खाते शिवसेनेकडे होते. परंतु आत्ता तसे पाहिले गेले तर नवीन सत्तांतरानंतर राज्यातील समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. म्हणून महत्त्वाची खाती आपल्याकडे घेण्यासाठी या दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच असली तरी सुद्धा समझोत्याने ही खाती वाटली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक ६ आमदारामागे १ कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात होणार असून भाजपला २८ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीसुद्धा आता महसूल व गृह खात्यावरून काय निर्णय घेतला जातो हे बघणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.



हेही वाचा - Spiritual Leader Murder : पैशाच्या वादातून मुस्लिम धर्मगुरू सुफी चिस्ती यांचा खून, संशयित ड्रायव्हर फरार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.